वाढत्या महागाईची झळ आता बदलापूरच्या जांभळांनाही बसलीय. किरकोळ बाजारात पावकिलो जांभळांसाठी ग्राहकांना 100 रूपये मोजावे लागतायेत. महागाई वाढल्यानं स्वस्त दरात जांभूळविक्री परवडत नसल्याचं आदिवासी महिलांचं म्हणणं आहे. अविट गोडीची काळीभोर जांभळं ही बदलापूरची खास ओळख आहे. बदलापूरच्या जांभळाला अधिकृतपणे भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय टॅग मिळालाय. मात्र महागाईमुळे यंदा जांभूळप्रेमींना खिशाला चाट द्यावी लागत आहे.
बदलापूरच्या आसपास अनेक छोटी-मोठी गावं असून याठिकाणची हलवा, काला खट्टा, गिरवी ही जांभळं विशेष लोकप्रिय आहेत. या जांभळांना बाजारात मोठी मागणी असते. उन्हाळ्यात आदिवासी बांधव जांभूळ आणि करवंद हा रानमेवा गोळा करून त्याची बाजारात विक्री करत असतात. दिवसभरातल्या विक्रीतून संध्याकाळी त्यांच्या घरची चूल पेटते. युद्धामुळे पेट्रेल-डिझेलचे दर वाढल्याने त्याचा फटका सर्वच गोष्टींना बसलाय.
भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. वाहतूक खर्चही वाढल्याने महागाईची झळ बदलापूरच्या जांभळांनाही बसलीय. किरकोळ बाजारात जांभळांचा दर 400 रूपये किलो इतका झालाय. जांभळांची एक पाटी अडीच ते तीन हजार किलोंना असल्यामुळे स्वस्त दरात जांभूळविक्री परवडत नसल्याचं आदिवासी महिलांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षी याच जांभळांचा दर 50 रूपये पाव इतका होता. यंदा मात्र जांभूळप्रेमींना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. अर्थात जांभूळ खरेदी करताना ग्राहक मोलभाव करत असले तरी हे फळ वर्षातून एकदाच मिळत असल्यामुळे बदलापूरच्या जांभळांना ग्राहक पसंती देत असल्याचं पाहायला मिळतंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.