'तुम तो ठहरे परदेसी' गाण्याचे गीतकार झहीर आलम यांचे निधन; ३ हजार रुपयांमध्ये लिहिलं होतं लोकप्रिय गाणं

Lyricist Zaheer Alam Passes Away: झहीर आलम हे प्रसिद्ध गीतकार होते. त्यांनी ‘तुम तो ठहरे परदेसी’ हे लोकप्रिय गाणं लिहिलं होतं. लोकप्रिय गाणी लिहूनही त्यांचे आयुष्य संघर्ष आणि आर्थिक अडचणींचे होते.
Lyricist Zaheer Alam Passes Away:
Renowned lyricist Zaheer Alam, who wrote the iconic song ‘Tum To Thehre Pardesi’, passed away in Nagpur.saam tv
Published On
Summary
  • तुम तो ठहरे परदेसी’ गाण्याचे गीतकार झहीर आलम यांचे निधन.

  • नागपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • ९० च्या दशकातील हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं.

मनोरंजन आणि संगीत क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 'तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे' या प्रसिद्ध गाण्याचे गीतकार झहीर आलम यांचे निधन आज झाले आहे. ११ मे रोजी नागपूरमध्ये त्यांचे निधन झाले. झहीर आलम नागपूरच्या मोमिनपुरा भागातील एका लहानशा घरात राहत होते.

Lyricist Zaheer Alam Passes Away:
Singer Death: 'पालखी निघाली राजाची' गाण्याच्या संगीतकाराचे निधन; गणेशभक्तांमध्ये हळहळ

गीतकार झहीर आलम यांची परिस्थिती हलाकीची

झहीर आलम यांनी लिहिलेले 'तुम तो ठहरे परदेशी' हे गाणे १९९० च्या दशकात सुपरहिट झाले होते. गायक अल्ताफ राजा यांनी या गाण्याला आपला आवाज दिला होता. हे आजही लोकं गात असतात. झहीर आलम यांनी लिहिली गाणी खूप लोकप्रिय झाली असली तरी, त्यांचे आयुष्य संघर्ष आणि आर्थिक अडचणींनी भरलेले होते. गेल्या काही वर्षांपासून ते जवळपास विस्मृतीत गेले होते. आता त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना दुःख झाले आहे.

Lyricist Zaheer Alam Passes Away:
Singer Trolled for Live Performance: प्रसिद्ध गायिकेचे लाईव्ह कॉन्सर्टवेळी अश्लील चाळे; स्टेजवरील कृत्याने चाहते संतापले, VIDEO

'तुम तो ठहरे परदेसी' हे गाणे सुरुवातीला स्थानिक पातळीवर कव्वाली म्हणून गायले जात होते. नंतर जेव्हा अल्ताफ राजा यांनी ते गायले, तेव्हा ते देशभरात लोकप्रिय झाले. ९० च्या दशकात हे गाणे सर्वत्र ऐकू येत होते आणि आजही ते तितकेच लोकप्रिय आहे. लोकप्रिय गाणे लिहिले असले तरी झहीर आलम याचा काही फायजदा झाला नाही.

एवढे हिट गाणे लिहूनही, झहीर आलमला फारसे मानधन मिळाले नाही. त्यांना त्या गाण्यासाठी फक्त ३,००० रुपये मिळाले होते. ते एका कापड गिरणीतही काम करत होते. त्यावेळी त्याचे आयुष्य चांगले चालले होते, पण गिरणी बंद झाल्यावर त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता.

ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

मराठी भावगीत आणि सुगम संगीत विश्वातील ज्येष्ठ गायक व संगीतकार गोविंदराव पोवळे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. सुगम संगीताच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना व्यक्त केली जातेय. ‘माती सांगे कुंभाराला’, ‘रात्र काळी घागर काळी’ यांसारख्या अजरामर गीतांनी गोविंदराव पोवळे यांनी रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com