
बदलापूर : बदलापूरमध्ये पुन्हा एकदा अत्याचाराची भयंकर घटना घडली आहे. बदलापूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या मैत्रिणीने आधी तिला बियर पाजली. त्यानंतर तिची शुद्ध हरपल्यानंतर या मैत्रिणीच्या रिक्षाचालक मित्राने १९ वर्षीय पीडित तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
बदलापूरमध्ये काही महिन्यांपूर्वी एका शाळेत दोन चिमुकल्यांवर कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना घडली होती. या अत्याचारातील दोषी अक्षय शिंदे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. या घटनेनंतर पुन्हा एकदा अत्याचाराची घटना घडली आहे. एका रिक्षाचालकाने तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी आहे.
पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता या तिच्या रिक्षाचालक मित्राला सोबत बोलावून घेतलं. या तिघांनी एकत्र मद्यपान केलं. मद्यपान केल्यानंतर रिक्षाचालकाने पीडित तरुणी शुद्धीत नसल्याचा गैरफायदा घेतला. रिक्षाचालक दत्ता याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात त्याची साथ दिल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिच्यासोबत घडलेला हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी पोलिसांनी २३ डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अवघ्या 12 तासात नराधम रिक्षाचालक दत्ता याला खरवई परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस रिक्षाचालक दत्ताला अटक करण्यासाठी गेले. त्यावेळी तो पोलिसांच्या भीतीने बहिणीच्या घरातील लोखंडी कपाटात लपून बसला होता.
पोलिसांनी अतिशय शिताफीने त्याला शोधून काढला. तर त्याच्या या कृत्यात साध देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.