Police Bans Nylon Manja: नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर 'संक्रांत'; थेट हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा होणार दाखल

Police Bans Nylon Manja in Chattrapati Sambhaji Nagar: आता मांजा विकाल तर तुमच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये मांजा विक्रीला बंदी घालण्यात आलीय.
Nylon Manja Banned
Nylon Manja BannedSaam Tv
Published On

आता मांजा विकाल तर तुमच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मांजा विक्रीला बंदी घालण्यात आली असून, आजतागायत मांज्यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच काहींचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. मांजा विक्रेता असो किंवा खरेदी करणारा व्यक्ती, आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर पाऊलं उचलली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय.

छत्रपती संभाजीनगर शहरात नायलॉन मांजा विकला तर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होईल. असा थेट इशारा पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिलाय. या निर्णयामुळे नायलॉन मांजाबाबत कलम ११० नुसार म्हणजेच सदोष मनुषयवधाच्या गुन्हांतर्गत कडक कारवाई केले जाईल. मांजा बाबात कडक कारवाई करणारा संभाजीनगर हे राज्यात पहिलेच शहर ठरले आहे.

Nylon Manja Banned
Chhatrapatil Sambhajinagar Scam: कंत्राटी कामगार, पगार १३ हजार; गर्लफ्रेंडला गिफ्ट केला 4 BHK अलिशान फ्लॅट

छत्रपती संभाजीनगर शहरात महिनाभरात मांजामुळे १५ जण जखमी झाले आहेत. तसेच अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासह पक्षांना देखील याचा नाहक त्रास झालाय. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ही कडक मोहीम हाती घेतलीय. शहरातील दुकानांमध्ये जर नायलॉन मांजा कुणी विकत असेल तर, त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल. आणि जर अल्पवयीन मुलं नायलॉन मांजा वापरताना दिसले तर, त्यांच्या पालकांवरही गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आलाय. याशिवाय ऑनलाइन नायलॉन मांजा ट्रान्सपोर्ट केलं तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Nylon Manja Banned
Sambhajinagar News: आईची नजर चुकवून विहिरीकडे गेले अन् अनर्थ घडला, सख्ख्या भावांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरासह नाशिकमध्ये देखील नायलॉन मांज्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र तरीही शहरात छुप्या पद्धतीनं मांजा विक्री केली जात होती. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. उंचाळे पोलिसांनी ग्राहक पाठवून मांजा विक्रेता आणि त्याच्या साथीदारास ताब्यात घेत २ लाख रूपयांचे २१० नायलॉन मांजा जप्त केले आहे. तर दोघांवर संक्रांतीपर्यंत तडीपारीची कारवाई पोलि‍सांकडून करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com