Chhatrapatil Sambhajinagar Scam: कंत्राटी कामगार, पगार १३ हजार; गर्लफ्रेंडला गिफ्ट केला 4 BHK अलिशान फ्लॅट

Divisional Sports Complex Scam: छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुलाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनीच 22 कोटींवर डल्ला मारला. सरकारी रक्कम स्वत:च्या खात्यात वळवल्याचा प्रकार समोर आलाय.
Divisional Sports Complex Scam  In Chhatrapati SabhajiNagar
Divisional Sports Complex ScamSaam Tv
Published On

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बाब समोर आलीय. येथील विभागीय क्रीडा संकुलात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तब्बल २२ कोटींचा घोटाळा केलाय. तेरा हजार रुपये पगार असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बॅकिंगच्या मदतीने छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला २१ कोटी ५९ लाख ३८ हजार रुपयांचा गंडा घातला.

या पैशातून आरोपीने बीएमडब्ल्यू कार, बीएमडब्ल्यू बाइक खरेदी केली, तर मैत्रिणीसाठी विमानतळासमोरील अपार्टमेंटमध्ये 4 बीएचके फ्लॅट विकत घेतला आहे. शहरातील नामांकित ज्वेलर्समध्ये डायमंडचा चष्माही बनवायची ऑर्डर दिली होती, तर दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीने ३५ लाखांची एसयूव्ही कार खरेदी केली आहे, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. हर्षकुमार अनिल क्षीरसागर असे मुख्य आरोपीचे नाव असून, तो एसयूव्ही कार घेऊन फरार झाला आहे.

Divisional Sports Complex Scam  In Chhatrapati SabhajiNagar
Crime News : बापरे! समृद्धी महामार्गावर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई; तब्बल १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त

घोटाळ्याच्या पैशात परदेशवारी

तेरा हजार पगार असणाऱ्या या आरोपीने महागड्या गाड्या, महागडे फ्लॅट्स आणि डायमंडचा चष्मा वापरला हे जितकं आश्चर्यकारक आहेत तितकंच या संपूर्ण प्रकाराचे विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रशासनाला कल्पना सुद्धा कशी लागली नाही हा मोठा प्रश्न आहे. क्रीडा संकुलासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी जमा होण्यासाठी क्रीडा संकुलाच्या नावाने इंडियन बँकेमध्ये खाते उघडण्यात आले होते, या खात्यातील व्यवहार क्रीडा उपसंचालकांच्या सहीने धनादेशाद्वारे होतो.

Divisional Sports Complex Scam  In Chhatrapati SabhajiNagar
Kalyan Crime : भाजप पदाधिकारी हल्ला प्रकरणी दोघे ताब्यात; तीनजण अजूनही फरार

मात्र विभागीय संकुलातील कंत्राटी कर्मचारी असलेले आरोपी हर्षकुमार क्षीरसागर, यशोदा शेट्टी आणि तिचा नवरा बीके जीवन यांनी बनावट कागदपत्रे तयार करून बँकेला दिली आणि स्वतःचा नंबर इंटरनेट बँकिंग साठी ऍक्टिव्हेट करून त्यावरून ही रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवली. विशेष म्हणजे विभागीय उपसंचालकाच्या 6 महिन्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

कसा केला घोटाळा

क्षीरसागरने हा घोटाळा करण्यासाठी उपसंचालकांच्या नाव आणि स्वाक्षरीचा वापर करून बँकेस बनावट मजकुराचे पत्र पाठवून खात्याला स्वतःचा मोबाइल क्रमांक जोडला.

मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बैंकिंग सुविधा सुरू करून घेत पैसे ट्रान्स्फर केले.

आतापर्यंत क्षीरसागर, शेट्टी यांच्या खात्यात आले 59 कोटी

फेसबुक मध्ये नोंदी, पावती बुक लिहिणे, बँकेची पत्रव्यवहार करणे असे काम क्षीरसागर आणि शेट्टी करत होते.

2023 पासून त्यांच्या खात्यात जवळपास 59 कोटी सात लाख 82 हजार रुपयांचा निधी आला.

त्यामधून कोट्यावधी रुपये त्यांनी वळती केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com