Badlapur News:लाडक्या बैलानेच घेतला मालकाचा जीव; मालकाच्या मृत्यूनंतर बैलानेही सोडले प्राण

Bull Killed Owner: बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका बैलानेच आपल्या मालकाचा जीव घेतल्याची घटना घडलीय.
Bull Killed Owner In Badlapur
Bull Killed OwnerSaam Tv
Published On

तुम्ही जर प्राणीप्रेमी असाल तर ही बातमी आवर्जून पाहा..अनेकजण आवडत्या पाळीव प्राण्याला जीव लावतात. त्याची काळजी घेतात. मात्र प्रत्येक पाळीव प्राणी मालकाशी इमान राखेलच असं नाही. हे आम्ही का म्हणतोय. कारण एका बैलमालकाला त्याच्या लाडक्या मालकानेच जिवानिशी मारलंय. काय आहे हा प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट.

अनेकजण प्राणी पाळतात. कुत्रा, मांजर यांच्याप्रमाणे गोठ्यातल्या बैलावर जीवापाड प्रेम करतात. मात्र अशाच एका लाडक्या बैलानं आपल्या मालकाचाच जीव घेतला. बदलापूरच्या वालिवली गावात ही धक्कादायक घटना घडलीय. या गावात राहणाऱ्या विजय म्हात्रे यांना त्यांच्याच बैलाने ठार केलंय. त्यानंतर काही तासातच या बैलाचाही मृत्यू झालाय.

विजय म्हात्रे हे कराटेपटू होते त्यांना स्केटिंगची आवड होती. बदलापूरच्या एका खासगी शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना बैलांच्या शर्यतीची आवड होती. त्यासाठी त्यांनी तीन वर्षांपूर्वी हा बैल खरेदी केला होता. या बैलाची तो पोटच्या लेकाप्रमाणे काळजी घेत होते. मात्र दोन दिवसांपूर्वी याच बैलानं त्यांचा घात केला. उल्हासनदी किनारी बैलाला घेऊन जात असताना बैलाच्या दोरीत त्यांचा पाय अडकला त्यानंतर या बैलानं विजय यांच्यावर हल्ला केला.

हा हल्ला इतका भयानक होता की त्यात विजय म्हात्रे यांचा मृत्यू झाला. या बैलाला काही दिवसांपूर्वी एका पिसाळलेल्या कुत्र्यांनं चावा घेतल्याची माहितीही समोर येतीय. विजय यांच्या मृत्यूनं संपूर्ण बदलापूर शहरात हळहळ व्यक्त होतीय. बैलगाडा शर्यतीची क्रेझ दिवसेंदिवस वाढतीय. त्यामुळे शर्यतीचे बैल पाळण्याचं प्रमाणही वाढलंय. मात्र एखादा प्राणी आक्रमक झाला तर तो मालकाचा जीवही घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कोणताही प्राणी पाळत असाल तर त्याची जितकी काळजी घेता तितकीच काळजी स्वत:च्या जिवाचीदेखील घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com