Cyber Crime : कंत्राट देण्याच्या बहाण्याने रेल्वे कंत्राटदाराची ४१ लाखांत फसवणूक

Jalgaon News : १४ डिसेंबरला त्यांना श्रीकांत मिश्रा असे नाव सांगणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने फोन करून सांगितले, की तुम्हाला लोखंडी सळईचा कंत्राट आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

जळगाव : ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशातच भुसावळ येथली एका रेल्वे ठेकेदाराची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. लोखंडी सळईचे कंत्राट देण्याचे आमिष दाखवत तब्बल ४० लाख ९६ हजार ९२० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या आयडिया लढवत फसवणूक करत आहेत. यातच कंत्राट देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार भुसावळमध्ये समोर आले आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, भुसावळ शहरातील शांतीनगरात गौरव अनिल मनवानी (वय २५) परिवारासह वास्तव्याला आहेत. १४ डिसेंबरला त्यांना श्रीकांत मिश्रा असे नाव सांगणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने फोन करून सांगितले, की तुम्हाला लोखंडी सळईचा कंत्राट मिळाला आहे. 

Cyber Crime
Agriculture News : दोन दिवसापासून ढगाळ वातावरण; रब्बी पिकांना धोका, हरभरा, द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत

कंत्राटासाठी भरण्यास सांगितली रक्कम 

कंत्राट मिळाले असून त्यासाठी काही रक्कम भरावी लागणार असल्याचे समोरच्याने मनवानी याना सांगितले. त्यानंतर १४ ते २३ डिसेंबरच्या दरम्यान वेगवेगळ्या बँक खात्यातून एनईएफटीच्या स्वरूपातून एकूण ४० लाख ९६ हजार ९२० रूपयांची ऑनलाइन पद्धतीने संबधित कंत्राट देणाऱ्याला ठेकेदाराने पाठविले. रक्कम दिल्यानंतर बराच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर पुढची काही कार्यवाही होत नसल्याने समोरच्याला विचारणा केली. 

Cyber Crime
Vitthal Rukmini Puja : विठ्ठल- रुक्मिणी नित्यपूजेचे तीन महिन्यासाठीचे बुकिंग फुल्ल; मंदिर समितीला मिळणार ५५ लाखाचे उत्पन्न

सायबर पोलिसात तक्रार 

मात्र, रक्कम दिल्यानंतरही कंत्राट मिळत नसल्याने ठेकेदाराला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गौरव मनवानी यांनी बुधवारी सायंकाळी पाचला जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीकांत मिश्रा असे नाव सांगणाऱ्या मोबाईलधारकारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सतीश गोराडे तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com