Vitthal Rukmini Puja : विठ्ठल- रुक्मिणी नित्यपूजेचे तीन महिन्यासाठीचे बुकिंग फुल्ल; मंदिर समितीला मिळणार ५५ लाखाचे उत्पन्न

Pandharpur news : विठ्ठल आणि रुक्मिणीच्या नित्यपूजा, तुळशी आणि पाद्यपूजेमध्ये पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी यासाठी मंदिर समितीने ऑनलाईन बुकिंगचा निर्णय घेतला यासाठीची यंत्रणा देखील कार्यान्वीत केली
Vitthal Rukmini Puja
Vitthal Rukmini PujaSaam tv
Published On

पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी नित्यपूजेसाठी बुकिंग करण्याची सुविधा सुरु करण्यात आली होती. यानंतर पुढील तीन महिन्यांसाठीचे बुकिंग काल पहिल्याच दिवशी फुल्ल झाले आहे. या नित्य पूजेसाठी झालेल्या बुकिंगमधून विठ्ठल मंदिर समितीला तीन महिन्यात सुमारे ५५ लाख उर्पये उत्पन्न तर इतर सर्व पूज्यांमधून सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

विठ्ठल आणि रुक्मिणीच्या नित्यपूजा, तुळशी आणि पाद्यपूजेमध्ये पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी; यासाठी मंदिर समितीने ऑनलाईन बुकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची यंत्रणा देखील कार्यान्वीत केली आहे. अर्थात नव्या वर्षातील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या सर्व पूजनासाठी भाविकांना बुकिंग हे ऑनलाईन पध्दतीने घरबसल्या करता येणार आहे. यासाठीची सुरवात कालपासून करण्यात आली आहे.

Vitthal Rukmini Puja
Food Poisoning : गुळपट्टी खाण्यातून दिंडीतील भाविकांना विषबाधा; शेगाव येथून परतल्यानंतर झाला त्रास

विविध राज्यांमधून बुकिंग

पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची रीघ सुरूच असते. यामुळे पंढरपुरात गर्दी कायम पाहण्यास मिळत असते. येथे येणाऱ्या भाविकांना दर्शनासोबत पूजेचा लाभ मिळावा. अर्थात सर्वसामान्य भाविकांना विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळावी; यासाठी मंदिर समितीने कालपासून भाविकांसाठी घर बसल्या ऑनलाईन पध्दतीने पूजा नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार राज्याच्या विविध भागातील भाविकांनी पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी केली.

Vitthal Rukmini Puja
Agriculture News : दोन दिवसापासून ढगाळ वातावरण; रब्बी पिकांना धोका, हरभरा, द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत

तीन महिन्याचे बुकिंग फुल्ल 
जानेवारी ते मार्च दरम्यान होणार्या नित्य, पाद्य आणि तुळशी पूजेचे ऑनलाईन बुकिंग सुरु झाले आहे. एकाच दिवशी जानेवारी ते मार्च दरम्यान होणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी नित्य पूजेचे बुकिंग फुल्ल झाले आहे. विठ्ठलाच्या नित्यपूजेसाठी २५ तर रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी ११ हजार रुपये देणगी शुल्क आकारण्यात आले आहे. विठ्ठल रुक्मिणीची नित्य पूजा ही सकाळी केली जाते. नित्य पूजेला विशेष महत्व असते. त्यामुळे या पूजेसाठी भाविकांची मोठी मागणी देखील असते. काल सायंकाळ पर्यंत तीन महिन्यासाठी नित्यपूजेचे बुकिंग फुल्ल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com