

बदलापूरजवळ हृदयद्रावक घटना घडली आहे. रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाला. ही महिला मुलासोबत टिटवाळा येथे गणपती दर्शनासाठी गेली होती. बदलापूरला परतताना जांभळे गावाजवळील पुलावर त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला.
बदलापूर पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. अरुणा अरूण कुलकर्णी असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ५० वर्षीय महिलेचं नाव आहे. अरुणा या कल्याणमधील एकविरा नगरातील रामदास सोसायटीत राहत होत्या. २८ जून रोजी रात्री मुलगा प्रतीक कुलकर्णी याच्यासोबत त्या दुचाकीवर टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या.
गणपती दर्शन घेऊन परतत असताना जांभळे गावाजवळील नदीवरील पुलावर त्यांच्या दुचाकीसमोर अचानक खड्डा आला. तो खड्डा प्रतीकला दिसला नाही. त्यानं दुचाकीचा ब्रेक दाबला. पण दुचाकी जागेवर थांबली नाही. त्याचा तोल जाऊन दुचाकी खड्ड्यात पडली. या अपघातात मागे बसलेल्या अरुणा कुलकर्णी या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अरुणा यांना तातडीने बदलापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. प्राथमिक तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.