Nandurbar Accident: नवापूरच्या कोंडाईबारी घाटात भीषण अपघात; ट्रक 35 फूट खोल दरीत कोसळला

Nandurbar Accident: नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात ब्रेक निकामी झाल्याने ट्रक 35 फूट खोल दरीत कोसळला. चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने जीवितहानी टळली.
Nandurbar Accident
Nandurbar AccidentSaam Tv
Published On

Nandurbar Accident: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील कोंडाईबारी घाटात गुरुवारी भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने जाणारा ट्रक अचानक 35 फूट खोल दरीत कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रक चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, ट्रक घाटातील उतारावरून जात असताना त्याचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी समोरून गुजरात राज्य परिवहन महामंडळाची बस येत होती. संभाव्य मोठी दुर्घटना टाळण्यासाठी चालकाने प्रसंगावधान राखत बसला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्यालगतच्या सुमारे 35 फूट खोल दरीत कोसळला.

Nandurbar Accident
FAOच्या जागतिक परिषदेत बारामतीच्या ADTची दखल; AI आधारित शेती संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता

या अपघातात चालक लोकेशभाई (रा. अजमेर) यांना किरकोळ दुखापत झाली. स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढून तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

Nandurbar Accident
Mumbai News: मॅनहोलमध्ये 'तो' माणूस कसा पडला? १० सेकंदाचा थरारक सीसीटीव्ही VIDEO आला समोर

अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे काही वेळातच घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com