माजी मंत्र्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा

Veteran Congress Leader Anantrao Thopte Receives State Funeral In Pune: माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिक आणि राजकीय मान्यवरांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
Final rites of former minister Anantrao Thopte performed with full state honours in Pune amid presence of leaders and citizens.
Final rites of former minister Anantrao Thopte performed with full state honours in Pune amid presence of leaders and citizens.saam tv
Published On

राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्यावर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या मैदानावर आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्ह्यातील आणि राज्यातील विविध राजकीय मान्यवरांसह हजारो नागरिकांनी अनंतराव थोपटे यांचे अंत्यदर्शन घेतले. शहरातील पोलीस ठाण्यासमोरील शिवप्रेरणा या त्यांच्या निवासस्थानी सकाळी आठ ते नऊ या वेळेत अंत्यदर्शन घेण्यात आले.

Final rites of former minister Anantrao Thopte performed with full state honours in Pune amid presence of leaders and citizens.
Myanmar Blast : शक्तीशाली बॉम्बस्फोटात ५५ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी; पाहा नेमकं काय घडलं?

त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्ययात्रेने अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या मैदानावर नेण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे आदींसह आमदार राहुल कुल व शंकर मांडेकर, प्रमुख मान्यवरांसह हजारो नागरिक आणि थोपटे प्रेमी उपस्थित होते.

Final rites of former minister Anantrao Thopte performed with full state honours in Pune amid presence of leaders and citizens.
Pune Crime News | पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून श्रद्धांजली

ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, अनंतराव थोपटे यांनी दीर्घकाळ भोर मतदारसंघाचे प्रभावी नेतृत्व केले. सहा वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. राज्य मंत्रिमंडळात विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी ग्रामीण विकास, शेती, पायाभूत सुविधा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सातत्याने कार्य केले. त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी लोकसंग्रह, साधेपणा आणि जनसेवा ही मूल्ये जपली.

Final rites of former minister Anantrao Thopte performed with full state honours in Pune amid presence of leaders and citizens.
Vasai-Virar: मोठी कारवाई! महिला महसूल अधिकाऱ्याला अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे व्यक्तिमत्त्व हे संयमी, सर्वसमावेशक आणि लोकहिताला प्राधान्य देणारे होते. विविध राजकीय पक्षांतील नेत्यांशी त्यांनी जपलेले स्नेहसंबंध आणि राजकारणातील सभ्य परंपरा कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने केवळ भोर तालुक्याचेच नव्हे, तर पुणे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. थोपटे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना करते, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com