Local Body Election: आधी कुस्ती नंतर दोस्ती; सांगोल्यात जयकुमार गोरे आणि शहाजी बापूंमधील वाद मिटला?

Maharashtra Solapur Politics: महापालिका निवडणुकीतील चुरशीच्या लढाईनंतर, भाजप आणि शिंदे सेनेतील वाद मिटलाय. नगरपालिकेच्या दोन जागा बिनविरोध झाल्यानं जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटील यांच्यातील वाद संपुष्टात आलाय.
Maharashtra Solapur Politics:
BJP and Shinde Sena leaders celebrating unopposed victories after ending their political rivalry in Sangola.saam tv
Published On
Summary
  • सुजाता चेतनसिंह केदार यांच्या विरोधातील शिवसेना उमेदवाराने अर्ज घेतला माघारी

  • सांगोल्यात माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि भाजपमध्ये अखेर मनोमिलन

  • भाजप शिवसेनामध्ये एकमत झाले. त्यानंतर दोन्ही पक्षाचे उमेदवार बिनविरोध झाले.

संजय महाजन, साम प्रतिनिधी

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये जोरदार कुस्ती झाली होती. अवघ्या दहा दिवसानंतर मात्र दोन्ही पक्षांमध्ये दोस्ती पाहायला मिळाली‌.विशेष म्हणजे भाजप उमेदवार मारूती बनकर आणि शिवसेनेचे उमेदवार आनंदा माने यांनी एकत्र येत बिनविरोध उमेदवारांच्या विजयाचा गुलाल उधळला. त्यामुळे सांगोल्यात मागिल काही दिवसांपासून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यात सुरू असलेला वाद ही या निमित्ताने संपुष्टात आला आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष यांच्या पत्नी सुजाता चेतनसिंह केदार यांच्या विरोधातील शिवसेना उमेदवाराने अर्ज घेतला माघारी, तर शिवसेना महिला तालुका अध्यक्ष नगरसेवक उमेदवार राणी आनंदा माने यांच्या विरोधातील अर्ज शेकाप उमेदवाराने अर्ज मागे घेतला. सांगोल्यात माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि भाजपमध्ये अखेर मनोमिलन झाले.

Maharashtra Solapur Politics:
Municipal Elections : महापालिका निवडणुकीला मुहूर्त कधीचा? महत्त्वाची तारीख आली समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

प्रभाग १ आणि ११ मधील निवडणूक न्यायालय आदेशाने पुढे ढकलली होती. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यामध्ये भाजप शिवसेनामध्ये एकमत झाले. त्यानंतर दोन्ही पक्षाचे उमेदवार बिनविरोध झाले. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. आता नगराध्यक्ष पदाच्या मतमोजणी मध्ये कोण बाजी मारणार याकडेच लक्ष लागले आहे. माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि भाजपमधील वादामुळे सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका चर्चेत आल्या.

Maharashtra Solapur Politics:
Municipal Election : पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागणार? वाचा महापालिका निवडणुकीचे अपडेट

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऐनेवळी सांगोल्यातील शेकाप पक्षासोबत युती केली होती, त्यामुळे शिंदेंची शिवसेना एकटी पडली होती. त्यामुळे शिवसेनाविरुद्ध भाजप असाच सामना नगरपालिका निवडणुकीत रंगला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने येथील नगरपालिकेच्या २ जागांसाठी २० डिसेंबरला मतदान होणार होते. मात्र तत्पूर्वीच शहाजी बापू पाटील यांनी भाजपची (BJP) हातमिळवणी करत दोन्ही जागा बिनविरोध केल्या झाल्यात. त्यामुळे वाद मिटवून शहाजी बापूंनी हातमिळवणी केल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.

सांगोल्यातील नगरपालिकेच्या उर्वरित दोन जागांसाठी भाजप शिवसेनेची युती झाली असून शहाजी बापू पाटील यांच्या पुढाकाराने आज गुरुवारी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने दोन्ही जागा झाल्या बिनविरोध निवडून आल्या. भाजप जिल्हाध्यक्षांच्या पत्नी सुजाता केदार या भाजपकडून बिनविरोध तर शिवसेनेकडून राणी माने या बिनविरोध विजयी झाल्या. येथील दोन्ही जागेवर दोन्ही पक्षाचे एक-एक उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे, आता सांगोल्यात २० तारखेला मतदान होणार नसून २१ तारखेच्या निकालाकडेच तालुक्याचे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com