मुंबई : मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आणि वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. अखिल चित्रे यांच्या प्रवेशामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. अखिल चित्रे हे वांद्र पूर्व मतदारसंघात मनसेकडून माजी आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट दिल्यामुळे नाराज होते. आता अखिल चित्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश करताच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
वांद्रे पूर्वमध्ये माजी आमदार तृप्ती सावंत यांना शेवटच्या क्षणी आयात करून मनसेकडून उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या अखिल चित्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. अखिल चित्रे यांनी २०१९ मध्ये वांद्रे पूर्व येथून मनसेकडून निवडणूक लढवली होती. त्यांना जवळपास ११ हजार मते मिळाली होती. मनसेच्या टेलिकॉम सेनेचे अखिल चित्रे हे कार्याध्यक्ष आहेत. ठाकरे गटात प्रवेश करताच अखिल चित्रे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे.
'मनसेला स्वतःचे उमेदवार निवडून आणायचे नाहीत, तर दुसऱ्यांचे उमेदवार पाडायचे आहेत. मी अशा पक्षात राहू शकत नाही, त्यामुळे मी आज शिवसेनेत प्रवेश केला. राज ठाकरे म्हणाले होते की, मला दुसऱ्यांची पोरं अंगा खांद्यावर खेळवायची नाहीत. मग आता काय करताहेत? दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी दुसऱ्या पक्षातून आयात करून उमेदवारी देतात म्हणून टीका केली. मग आता तृप्ती सावंत यांना पक्षात घेऊन उमेदवारी का दिली? असा सवाल करत अखिल चित्रे यांनी मनसेवर टीका केली.
दरम्यान, आज ठाकरे गटात अजित पवार गटानंतर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, 'वरळीसाठी जे करायला हवं होतं. ते शिंदे गटाने केलं नाही, असा यांचं मतं आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप मुंबई लुटू पाहताय, हे पाप ते करताय. महाराष्ट्रची आर्थिक घडी पुन्हा एकदा बसवायची आहे. मागील आठवड्यात अजित पवार गटाचे पदाधिकारी आले होते. आज शिंदे गटाचे आले. या सगळ्यांचं मी स्वागत करतो'.
माहीमच्या सभेबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'माहीममध्ये माझी सुद्धा सभा होणार आहे. मी दोन-तीन दिवस प्रचार करणार आहे. आमचे नेते आणि विभाग प्रमुख माहीममधील प्रचाराचे नियोजन करत आहेत'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.