Uddhav Thackeray : राज्यात देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ, मिळून महाराष्ट्र खाऊ; उद्धव ठाकरे महायुतीवर कडाडले

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. ठाकरेंनी महायुतीतील तिन्ही नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
राज्यात तीन भाऊ, मिळून महाराष्ट्र खाऊ; उद्धव ठाकरे महायुतीवर कडाडले
Uddhav Thackeray Saam tv
Published On

अमर घटारे,साम टीव्ही

अमरावती : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने घोषणांचा पाऊस केला आहे. महायुतीने मतदारांसाठी विविध घोषणा जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीने अनेक भागात प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, याच महायुतीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. 'तीन भाऊ, सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी महायुतीवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे हे अमरावती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान,विधानसभेच्या जाहीर सभेत ठाकरे म्हणाले, 'खासदार बळवंत वानखेडे यांना आम्ही दिल्लीत पाठवलं आहे. ही दर्यापूरची जागा शिवसेनेला दिली. आपण लोकसभेला दाखवून दिलं, पण हे आव्हान संपलं नाही. माजलेल्या सत्ताधाऱ्यांच्या बुडाखली ठिणगी पेटली आहे. यांच्या डोक्यात सत्ता गेली. हे फुग्यात गेले आहे. येथील खासदार कोणत्या मस्तीत होते, त्यांना तुम्ही हरवलं'.

राज्यात तीन भाऊ, मिळून महाराष्ट्र खाऊ; उद्धव ठाकरे महायुतीवर कडाडले
Congress News : मविआमध्ये कॉंग्रेसची नमती भूमिका, काही जागांवर घेणार माघार ?
राज्यात तीन भाऊ, मिळून महाराष्ट्र खाऊ; उद्धव ठाकरे महायुतीवर कडाडले
Assembly Election: निवडणुकीत योगींचा 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा; हरियाणानंतर महाराष्ट्रातही भाजपचा अजेंडा सेट

उद्धव ठाकरेंनी यावेळी महायुतीवर जोरदार घणाघात केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, 'सगळे तीन भाऊ, देवा भाऊ,दाढी भाऊ,जॅकेट भाऊ, सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ'.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवर बोलताना ठाकरे म्हणाले, 'मी कर्ज मुक्ती केल्यानंतर कधीच शो केला नाही. मी तुमच्यावर उपकार नाही केले. मी माझं कर्तव्य पार पडलं होतं. मी कमीत कमी काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं'.

राज्यात तीन भाऊ, मिळून महाराष्ट्र खाऊ; उद्धव ठाकरे महायुतीवर कडाडले
Ajit Pawar Manifesto: लाडक्या बहिणीचे पैसे २१०० रुपये, २.५ दशलक्ष नोकऱ्या, अजितदादांचा वादा; राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात काय काय?

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार ठाकरेंनी अमरावतीत घेतला. 'मुंब्रा आमचाच आहे, तो काय पाकिस्तानात आहे का? फडणवीस यांना मला सांगायचं आहे की, मुंब्रा हे ठाणे जिल्ह्यामध्ये येते. आता त्यांचा पालकमंत्री गद्दार आहे पण गद्दऱ्यांच्या हाताने ते मंदिर होणार नाही ते बांधू शकत नाही. जो राजकोटचा पुतळा बांधला होता, तो वाऱ्यामुळे पडला. मग मुख्यमंत्र्यांची दाढी हालत नाही. दुसऱ्या मुख्यमंत्र्यांचं जॅकेट हालत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी माफी का मागितली नाही, असा सवाल करत ठाकरेंनी महायुतीवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com