आपलं स्वतः चं हक्काचं घर असावे, असं प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असते. त्यासाठी प्रत्येकजण खूप आधीपासूनच गुंतवणूक करतात. पंरतु सध्या घरांच्या किंमती खूप जास्त वाढल्या आहेत. त्यामुळे गृहकर्ज हे घ्यावेच लागते. गृहकर्ज म्हटल्यावर दर महिन्याला त्याचे हप्ते भरावे लागता. गृहकर्जावर व्याजदर जर जास्त असेल तर खिशाला कात्रीच बसते. त्यामुळे कमी व्याजदर असलेल्या बँकेतून गृहकर्ज घेणे चांगले असते. गृहकर्जावरील ईएमआय भरताना सर्वसामान्य नागरिकांच्या महिन्याच्या खर्चावर परिणाम होतो. त्यामुळेच तुम्ही महिन्याचा खर्च आणि ईएमआयचे योग्य नियोजन केले पाहिजे.
जर तुमच्या ईएमआयचे पैसे वाढले तर व्याजही वाढते. त्यामुळे गृहकर्जाची परतफेड करता करता खूप कालावधी जातो. त्यामुळे तुम्ही योग्य नियोजन करायला हवे. आज आम्ही तुम्हाला असे काही पर्याय सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही कमी कालावधीत ईएमआयची रक्कम भरु शकतात. त्यामुळे व्याजदरही वाढणार नाही.
प्रीपेमेंट
तुम्ही जर तुमच्या हप्त्यांचे पेमेंट अॅडव्हान्समध्ये केले तर ईएमआयची मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज कमी केले जाऊ शकते. तसेच उर्वरित रक्कमदेखीस हळूहळू कमी होईल. तुम्ही प्री पेमेंट केल्यामुळे तुमच्या होमलोनचा कालावधीदेखील कमी होईल. तसेच ईएमआय बाउन्स आणि त्यावरील शुल्कदेखील टाळता येते.
ईएमआयपेक्षा जास्त पैसे भरणे
ईएमआय हा ठरावीक वेळेतच भरावा लागतो. काही ठरावीक रक्कत निश्चित असते तेवढा ईएमआय भरावा लागतो. परंतु तुम्ही ठरलेल्या रक्कमपेक्षा जास्त पैसेदेखील भरु शकता. त्यामुळे तुमचे हप्ते लवकर संपतील. परिणामी तुमच्या गृहकर्ज लवकरात लवकर भरले जाईल.
मोठी रक्कम एकत्र भरा
तुमच्याकडे जर मोठी रक्कम हातात असेल तर तुम्ही ती रक्कम एकत्र भरु शकता. जर तुम्ही ही रक्कम एकाचवेळी भरली तर तुमचे गृहकर्ज कमी होईल. त्यामुळे ईएमआय आणि त्यावरील व्याजदर वाचेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.