Home Loan : गृहकर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात घ्या, नाहीतर आर्थिक फटका बसण्याची शक्यता

Home loan Bank Interest Rate : गृहकर्ज घेण्यापूर्वी किमान तीन महिन्यांसाठी कर्जाचा EMI भरण्याचा सराव केला पाहिजे. तसं केल्यास इतर खर्चांसह गृहकर्जाचा EMI भरण्यास तुम्ही सक्षम आहात की नाही हे कळतं.
Home Loan, Home loan Bank Interest Rate
Home Loan, Home loan Bank Interest RateSaam TV

Home Loan Tips:

गृहकर्ज घेणे हा एक मोठा आर्थिक निर्णय मानला जातो, त्यामुळे कर्ज घेताना आपल्याला अनेक बँकांचे व्याजदर एकदा तपासून पाहायला हवे. गृहकर्ज घेण्यापूर्वी किमान तीन महिन्यांसाठी कर्जाचा EMI भरण्याचा सराव केला पाहिजे. तसं केल्यास इतर खर्चांसह गृहकर्जाचा EMI भरण्यास तुम्ही सक्षम आहात की नाही हे कळतं.

स्वतःचे घर हे प्रत्येकाचं स्वप्न असते. आजकाल घरांच्या किमती वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक गृहकर्ज (Loan) घेतात. अशा परिस्थितीत लोक गृहकर्जाची मदत घेतात. गृहकर्ज घेण्यापूर्वी आत्मपरीक्षण करणेही गरजेचे असते. गृहकर्जाची मुदत ३० वर्षांपर्यंत असते. गृहकर्ज घेतल्यास घराच्या मूळ रकमेपेक्षा जास्त व्याज भरावं लागतं. परंतु, गृहकर्जा घेताना काही गोष्टींची माहिती असली पाहिजे.

गृहकर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींबद्दल माहिती पाहिजे. लक्षात ठेवा, जर गृहकर्जाचा ईएमआय तुमच्या पगाराच्या (Salary) ४०% पेक्षा जास्त असेल तर तुमच्या दैनंदिन बजेटवर त्याचा खूप परिणाम होईल. त्यामुळे गृहकर्ज घेताना तुम्ही इतर कोणत्याही कर्जाचा विचार करू नका. त्याचं कारण म्हणजे गृहकर्जाला सर्वात मोठे कर्ज मानले जाते. गृहकर्ज घेण्यापूर्वी काही गेष्टींचा विचार करा.

Home Loan, Home loan Bank Interest Rate
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : चंद्रग्रहण! या ५ राशींना होईल धनलाभ, वाचा एका क्लिकवर साप्ताहिक भविष्य

गृहकर्ज घेण्यापूर्वी तुम्ही किमान तीन महिन्यांसाठी कर्जाच्या EMI भरण्याचा विचार केला पाहिजेल. यामुळे तुम्हाला इतर खर्चांसोबत गृहकर्जाची परतफेड करण्यास सक्षम आहात की नाही ते कळेल. घर एक लिक्विड ऍसेट नाही. लिक्विड ऍसेट म्हणजे एक अशी मालमत्ता जी गरजेनुसार पैसे उभे करण्यासाठी लगेच विकता येते. घर (Home) विकण्यासाठी खूप वेळ लागतो आणि योग्य किंमतीत खरेदी करणारा ग्राहक मिळणे सोपे नाही. या परिस्थितीत, तुम्हाला जर अचानक पैशांची गरज असली तर लगेच घर विकून तुम्हाला पैसे उभे करता येणार नाही.

Home Loan, Home loan Bank Interest Rate
Thyroid : वाढत्या थायरॉइडच्या समस्येकडे करु नका दुर्लक्ष, आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

तुम्ही गृहकर्ज घेणार असाल तर तुमच्या इतर खर्चावर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजेल. कर्जाच्या ईएमआय व्यतिरिक्त मुलांचे शिक्षण असे इतर अनेक महत्त्वाचे खर्चांच्या जबाबदाऱ्यांपासून तुम्ही सुटू शकत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com