Assembly Election: निवडणुकीत योगींचा 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा; हरियाणानंतर महाराष्ट्रातही भाजपचा अजेंडा सेट

Assembly Election: महाराष्ट्रात आरक्षणावरून संघर्ष सुरू असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचारात बटेंगे तो कटेंगेचा नारा दिलाय.. मात्र ही घोषणा कुठून आली आणि ही योजना महाराष्ट्रात प्रभावी ठरणार का? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Assembly Election: निवडणुकीत योगींचा 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा; हरियाणानंतर महाराष्ट्रातही भाजपचा अजेंडा सेट
Published On

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत धुरळा उडवून देणाऱ्या बटेंगे तो कटेंगे घोषणेने महाराष्ट्राच्या राजकारणात एण्ट्री केलीय.. आधी मुंबईत बटेंगे तो कटेंगे आशयाचे लागलेले बॅनर आणि त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी वाशिमच्या सभेतून हिंदूंनी एकत्र येण्याचं आवाहन केलंय..एवढंच नाही तर मतांची विभागणी झाल्यास कापले जाण्याचा इशाराही योगींनी दिलाय.

लोकसभा निवडणुकीत धार्मिक धृवीकरणाचा भाजपला मोठा फटका बसला. त्यामुळे आता भाजपने विविध राज्यांच्या निवडणुकीत आक्रमकपणे हिंदूंना एकत्र येण्याचं आवाहन केलंय..ंमात्र बटेंगे तो कटेंगेचा नारा कुठून आला? पाहूयात.

Assembly Election: निवडणुकीत योगींचा 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा; हरियाणानंतर महाराष्ट्रातही भाजपचा अजेंडा सेट
Maharashtra Election: अमळनेरमध्ये रंगणार तिरंगी लढत; अनिल शिंदेंमुळे पाटलांच्या विजयाचं गणित बिघडणार?

बटेंगे तो कटेंगेचा नारा कुठून आला?

26 ऑगस्टला योगी आदित्यनाथ यांच्याकडून बांग्लादेशचं उदाहरण देत बटेंगे तो कटेंगे नारा

जम्मू काश्मीर निवडणुकीत जम्मूतील हिंदुबहूल भागात योगींकडून बटेंगे तो कटेंगे घोषणेचा वापर

हरियाणा निवडणुकीतही योगींचा बटेंगे तो कटेंगे नारा

झारखंड निवडणुकीच्या सभांमध्येही योगींकडून घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारातही बटेंगे तो कटेंगे घोषणेचा वापर

उत्तर प्रदेशमध्ये योगींनी बटेंगे तो कटेंना नारा दिल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून अखिलेश यादव यांनी जुडेंगे तो जितेंगे म्हणत प्रत्युत्तर दिलं. आता महाराष्ट्रातही आरक्षणासाठी जाती-जातीत संघर्ष सुरु असल्याने भाजपचा हिंदू ध्रुवीकरणासाठी बटेंगे तो कटेंगे हा अजेंडा यशस्वी होणार का? याकडे लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com