Maharashtra Election: अमळनेरमध्ये रंगणार तिरंगी लढत; अनिल शिंदेंमुळे पाटलांच्या विजयाचं गणित बिघडणार?

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येण्यास सुरुवात झालीय. तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये महाविकास आघाडीने मंत्री अनिल पाटलांची कोंडी केलीय. मात्र अमळनेरचं राजकीय समीकरण कसं आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Maharashtra Election: अमळनेरमध्ये रंगणार तिरंगी लढत; अनिल शिंदेंमुळे पाटलांच्या विजयाचं गणित बिघडणार?
Published On

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अमळनेरमधून अनिल पाटीलांना विधानसभेत जाऊ न देण्याचा निर्धार शरद पवारांनी केलाय.. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अमळनेरची जागा काँग्रेसला सोडण्यात आलीय. त्यामुळे काँग्रेसने अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांसमोर अनिल शिंदेंना उमेदवारी दिलीय.

तर भाजपच्या बंडखोर शिरीष चौधरींनीही अनिल पाटलांविरोधात दंड थोपटलेत... त्यामुळे साने गुरुजींच्या अमळनेरमध्ये यंदा तिरंगी लढत रंगणार हे स्पष्ट झालंय.. मात्र अनिल पाटील आणि शिरीष चौधरी दोघांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.

Maharashtra Election: अमळनेरमध्ये रंगणार तिरंगी लढत; अनिल शिंदेंमुळे पाटलांच्या विजयाचं गणित बिघडणार?
Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

आधी जनता दल आणि नंतर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या अमळनेरमध्ये 2009 नंतर सलग 2 वेळा अपक्षांनी विजय मिळवला. तर 2019 मध्ये भापजमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या अनिल पाटलांनी गड काबिज केला. 2019 मधील अमळनेरच्या मतांचं समीकरण नेमकं कसं होतं? पाहूयात.

2019 मधील मतांचं गणित

अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस, 93 हजार 757 मतं

शिरीष चौधरी, भाजप, 85 हजार 163 मतं

8 हजार 594 मतांनी अनिल पाटलांचा विजय

अमळनेरमध्ये मराठा, तेली-चौधरी आणि माळी या तीन समाजाचं मोठं वर्चस्व आहे. या जातींची संख्या किती? पाहूयात.

अमळनेरचा जातीय समीकरण

मराठा- 40%

तेली- चौधरी- 25 %

माळी - 20%

गेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल पाटील आणि शिरीष चौधरी यांच्यात थेट लढत होती. त्यामुळे मराठा मतांच्या ध्रुवीकरणाचा अनिल पाटलांना फायदा झाला होता. मात्र यावेळी काँग्रेसनं अनिल शिंदेंच्या रुपात मराठा उमेदवार दिल्यामुळे शिरीष चौधरींना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अनेळनेरच्या जनतेनं २००९ पासून कोणालाही दुस-यांदा संधी दिलेली नाही. त्यामुळे अनिल पाटील ही परंपरा मोडणार की मतदार आपली परंपरा कायम राखणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com