Mahim Constituency : अमित ठाकरेंना आव्हान कायम; सदा सरवणकरांच्या पुत्राचा लढण्याचा निर्धार, म्हणाले,' छत्रपती लढले अन् जिंकले'

Amit Thackeray News : अमित ठाकरेंना निवडणुकीत आव्हान कायम असणार आहे. सदा सरवणकर यांच्या पुत्राने लढण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे अमित ठाकरेंना मार्ग खडतर असणार आहे.
अमित ठाकरेंना आव्हान कायम; सदा सरवणकरांच्या पुत्राचा लढण्याचा निर्धार, म्हणाले,'  छत्रपती लढले अन् जिंकले'
Mahim Constituency Saam tv
Published On

मुंबई : मुंबईतील काही विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झालं आहे. मुंबईच्या माहीम विधानसभा मतदारसंघातील लढाईकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. या विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांना शिवसेनेच्या दोन्ही गटाचं आव्हान आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान, मनसेकडून माहीममधील शिंदे गटाने उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती केली जात असल्याची माहिती आहे. दुसरीकडे या विधानसभा मतदारसंघातून लढण्यास सदा सरवणकर लढण्यास ठाम आहे. यानंतर आता त्यांच्या मुलानेही व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.

माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांच्यासाठी महायुती आणि महायुतीकडून लॉबिंग सुरु असल्याची चर्चा आहे. अमित ठाकरे यांच्या विरोधात शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर मैदानात आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून महेश सावंत मैदानात उतरले आहेत. यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळत आहे. मात्र, अमित ठाकरेंचा रस्ता सोपा करण्यासाठी सदा सरवणकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मागणी केली जात आहे. या सर्व मुद्द्यांवरून आज सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर बैठक होणार असल्याची माहिती आहे.

अमित ठाकरेंना आव्हान कायम; सदा सरवणकरांच्या पुत्राचा लढण्याचा निर्धार, म्हणाले,'  छत्रपती लढले अन् जिंकले'
Amit Thackeray : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? अमित ठाकरेंनी केलं मोठं वक्तव्य, VIDEO

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी घेण्यात येणाऱ्या बैठकीत अमित ठाकरेंना विधान परिषदेवर घेऊन मंत्री करूयात, असा प्रस्ताव शिवसेना भाजपकडे ठेवणार आहे. असा प्रस्ताव ठेवून शिवसेना चाचपणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडे वर्षा बंगल्यावर चर्चा होणार असल्याचं वृत्त आली असताना समाधान सरवणकर यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेत आलं आहे.

समाधान सरवणकर यांनी स्टेटसमध्ये लिहिलंय की, 'अखंड जग महाराष्ट्राला लढवय्या म्हणून ओळखत. जो लढतो तो खरा लढवय्या. नावाची कीर्ती ही कामाने होते. छत्रपती हे लढले जिंकले. अनेक संकटाला सामोरे गेले, तेव्हा ते अधिपती झाले. मनगटात बळ असेल तर घाबरायचं कशाला समोर कोणी लढू नये ही अपेक्षा चुकीची. जनतेला हे कधीही आवडणार नाही'.

अमित ठाकरेंना आव्हान कायम; सदा सरवणकरांच्या पुत्राचा लढण्याचा निर्धार, म्हणाले,'  छत्रपती लढले अन् जिंकले'
Sharad Pawar Vs Ajit Pawar : पुण्यातील ८ मतदारसंघात राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी; कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार?

दरम्यान, समाधान सरवणकर यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरून सदा सरवणकर हे निवडणूक लढण्यावर ठाम असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्यासमोर सदा सरवणकर यांच्यासहित ठाकरे गटाचे महेश सावंत यांचंही तगडं आव्हान असणार आहे. त्यामुळे अमित ठाकरेंसाठी लढाई सोपी नसल्याचं बोललं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com