Sadabhau Khot: सदाभाऊ यांचा मेंदू गुडघ्यात आलाय का? अजित पवार गटाच्या महिला नेत्याची टीका

NCP Leader Rapuli Thombare Criticized Sadabhau Khot : एका सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
सदाभाऊ यांचा मेंदू गुडघ्यात आलाय का? अजित पवार गटाच्या महिला नेत्याची टीका
Sadabhau KhotSaam Tv
Published On

Maharashtra Politics: सदाभाऊ यांचा मेंदू गुडघ्यात आलाय का? तुम्ही ही चुकीची भाषा वापरत आहात , ती भाषा जपून वापरा. आपले मतभेद आहेत मनभेद नाहीत अशी खरमरती टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केलीय. शरद पवार यांच्यावर शारिरिक व्यंगावर टीका केल्यानंतर अजित पवारांना सदाभाऊ यांची कानउघडणी केली. त्यानंतर आता परत त्यांच्या गटातील नेत्या रुपाली ठोंबरे यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर कठोर शब्दात टीका केली.

शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना शरद पवार यांच्यावर टीका चांगलेच अंगलट आलंय. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या चेहऱ्यावरून खोचक टीका केलीय. जत तालुक्यातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार करताना सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. शरद पवारांना महाराष्ट्र बदलायचा आहे. त्यांच्या चेहऱ्यासारखं राज्य बदलणार का, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी टीका केली होती. सदाभाऊ यांच्या टीकेनंतर राजकीय वर्तुळात पडसाद उमटलेत. त्यानंतर अजित पवार यांनी सदाभाऊ यांची कानउघडणी केली.

ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी महायुतीतील घटक पक्षांचे नेते सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. आम्ही महायुतीचे घटक असलो तरी अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नसल्याचं म्हटलं.

सदाभाऊ यांचा मेंदू गुडघ्यात आलाय का? अजित पवार गटाच्या महिला नेत्याची टीका
Rahul Gandhi News : राहुल गांधींची संविधानासह महाराष्ट्रात एन्ट्री; आरक्षणाबाबत दिली मोठी गॅरंटी

शरद पवार यांच्याविषयी बोलताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. हे खूप निंदनीय आहे. ते ऐकून माझासारखी महिला म्हणेल की, सदाभाऊ यांचा मेंदू डोक्यातून गुडघ्यात आलाय. राजकीय नेत्यांनी बोलतांना नक्कीच भान ठेवलं पाहिजे. जी भाषा त्यांनी वापरली ती निंदनीय आणि निषेध करण्यासारखी आहे. याचा निषेध काल अजित पवार यांनी केला होता आणि सदाभाऊ यांची कान उघडणी केली होती.

विनाशकारी विपरीत बुद्धी असं अजित पवार म्हणालेत. पण मी यावर म्हणेन की, सदाभाऊ खोत यांचा मेंदूत गुडघ्यात आलेला आहे. भाषण करताना अशी वापरली तर लोकांसमोर वेगळा मेसेज जात असल्याचं रुपाली ठोंबरे म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com