aaditya thackeray
aaditya thackeray News Saam tv

Hindi language Row : महाराष्ट्र एकत्र येतो, तेव्हा...; आदित्य ठाकरेंचा भाजपवर टोकदार बाण

aaditya thackeray on language Row : आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. धारावीत माध्यमांशी बोलताना ठाकरेंनी भाजपवर टीका केली.
Published on

संजय गडदे, साम टीव्ही

हिंदी सक्तीच्या विरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा ५ जुलै रोजी निघणार आहे. ठाकरे बंधूंच्या मोर्च्याला विविध पक्ष आणि नेत्यांकडून पाठिंबा मिळत आहे. ठाकरे बंधूच्या आक्रमक भूमिकेमुळे महायुती सरकारचं टेन्शन वाढलं आहे. याच हिंदी सक्तीवरून आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

aaditya thackeray
Prakash Ambedkar : अचानक 76 लाख मतांची भर, विधानसभेची निवडणूक पारदर्शक होती का? प्रकाश आंबेडकरांचा कोर्टाच्या निर्णयावर सवाल

आदित्य ठाकरे धारावी दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. आदित्य ठाकरे म्हणाले, 'धारावीतील लोक आहेत, ते भेटायला आले होते. या लोकांनी शासनावर विश्वास ठेवून सर्वेक्षण करू दिले. पहिल्याच यादीत हे अपात्र ठरले. या सर्व्हे ८० टक्के लोकांना अपात्र ठरवून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाठवणार आहे. मुंबईसाठी आम्ही लढत राहू. अदानी यांनी कोणतंही पाऊल उचलू द्या. मी जेव्हा अदानींवर बोलतो, तेव्हा मला ट्रोल केले जातं. पण भाजपवर बोललो तर ट्रोल केले जात नाही. जिथे आहे, तिथेच लोकांना घर मिळालं पाहिजे'.

aaditya thackeray
Wardha News : दूधाचे उपकार फेडले! एकाच्या साथीने १५ वर्षांच्या मुलाने वाचवला पुरात अडकलेल्या आईचा जीव, वाचा घटनेचा थरार

'जगातील सर्वात मोठा जमीन घोटाळा धारावी असू शकतो. भाजपचा हा घोटाळा आम्ही करू देणार नाही. आता ते आमदार कुठे आहेत, जे गुवाहाटीला जाण्यासाठी पुढे पुढे होते, आता कुठे आहे. हिंदीची सक्ती नसावी. राज्यात तोडो फोडून राजकारण सुरू आहे, त्याविरोधात आम्ही एकत्र येऊ. भाजपमध्ये मराठी माणूस आहेत, त्यांनी पुढे यावे. अहवाल येणे एक गोष्ट आहे आणि तज्ञांकडे जाणे एक गोष्ट आहे. आम्ही जीआर काढला आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

aaditya thackeray
Badlapur : ४ वर्षांच्या मुलीचं अपहरण, ट्रेनने मध्य प्रदेश गाठलं अन्...; पोलिसांकडून २४ तासांत मुलीची सुटका, धक्कादायक माहिती समोर

'मुंबईचं कोस्टल रोड आमचे स्वप्न होते. पुढच्या कामाचे टप्पे आम्ही दाखवले होते. आम्ही ८० टक्के काम केले. समृद्धीत खड्डे पडले, त्यामुळे त्यांना गुजरातला जावे लागले. कॉस्ट एस्क्लेशनकरून कोस्टलचे बांधकाम केले आहे, असे ठाकरे पुढे म्हणाले. उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्लानं मुंबईत उत्तर भारतीय महापौरासाठी गणित मांडलं. त्यावर आदित्य ठाकरे यांनीही भाष्य केलं. 'ही संघटना कोणाशी निगडित आहेत, हे पाहिले पाहिजे. यामागे भाजप आहे का, हे आधी तपासले पाहिजे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com