Prakash Ambedkar : अचानक 76 लाख मतांची भर, विधानसभेची निवडणूक पारदर्शक होती का? प्रकाश आंबेडकरांचा कोर्टाच्या निर्णयावर सवाल

Prakash ambedkar News : वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीसंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर आंबेडकरांनी आता सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं ठरवलं आहे.
Prakash ambedkar
Prakash ambedkar News : Saam tv
Published On

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर अचानक वाढलेल्या 76 लाख मतांबाबत दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ही निवडणूक प्रक्रिया खरोखरच पारदर्शक झाली का, यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत गंभीर प्रश्न उपस्थित केले. या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्यातेही त्यांनी स्पष्ट केले. ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही दाखल केलेली याचिका ही निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, नियमबद्ध आणि कायद्यानुसार झाली की नाही, याच्या तपासणीसाठी होती. मात्र, त्यांनी स्पष्ट करताना सांगितले की, निवडणूक आयोगाने २०-११-२०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या प्रेसनोटमध्ये मतदानाची टक्केवारी 6.80% वाढली असल्याचे नमूद आहे, ज्यामध्ये तब्बल 76 लाख मतांची भर पडली होती'.

Prakash ambedkar
Bharat Gogawale : पालकमंत्रिपदाबाबत फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांना विचारा; गोगावलेंची प्रतिक्रिया

'मतदानाची आकडेवारी आयोग मान्य करत असेल, तर त्या अनुषंगाने नोंदी आहेत का? हे आम्ही विचारले होते. पण, त्या नोंदी कोर्टात सादर केल्या गेल्या नाहीत. अशा परिस्थितीत ही निवडणूक खरोखर मुक्त आणि पारदर्शक होती का? याची तपासणी व्हायलाच हवी होती, असा ठाम आग्रह आंबेडकरांनी व्यक्त केला.

Prakash ambedkar
Maharashtra Politics : लाडक्या बहिणींसाठी पैसे नाहीत, पण सरकारी पाहुणचार चांदीच्या थाळीत; विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की, आम्ही याचिका दाखल केली होती, ती निवडणूक याचिका नव्हती, तर निवडणूक कंडक्टवरील रीट पिटीशन होती. मात्र, कोर्टाने तिचा निवडणूक याचिका असा अर्थ लावून ती निवडणूक याचिका असल्याचे समजले आणि त्याच आधारावर निकाल दिला. हा लोकशाहीला धक्का आहे. जर ही गैर संविधानिक पिटीशन होती, तर ती कशी गैर संविधानिक आहे ते सांगावे. जेव्हा निवडणूक आयोग स्वतः म्हणतोय की, 76 लाख मतदान झाले आहे असे मान्य करत आहे आणि म्हणतंय की, याचा डाटा अमच्याकडे नाहीये, तर ही पारदर्शक निवडणूक कशी काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Prakash ambedkar
Malegaon Sugar Factory Election result : 'माळेगावचे दादा' अजित पवारच; उपमुख्यमंत्र्यांनी काढला पराभवाचा वचपा, वाचा स्पेशल रिपोर्ट

'या जजमेंटवरून असं दिसून येत आहे की, निवडणुकीत जी चोरी झाली आहे, ती या चोरांना पाठीशी घालत आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. एका वृत्तपत्राच्या विश्लेषणात आम्ही उल्लेख केला होता, पण कोर्टाने त्याला गांभीर्याने घेतले नाही. इतकंच नाही, तर निवडणूक आयोगाची अधिकृत प्रेस नोटही निकालात विचारात घेतलेली नाही, असे सांगत त्यांनी न्यायालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com