Bharat Gogawale : पालकमंत्रिपदाबाबत फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांना विचारा; गोगावलेंची प्रतिक्रिया

bharat gogawale News : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत मंत्री भरत गोगावले यांनी मोठं भाष्य केलं आहे.
bharat gogawale News
bharat gogawaleSaam tv
Published On

सचिन कदम, साम टीव्ही

रायगड : रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्रिपदाचा तिढा संपता संपेना झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांना गेल्या ६ महिन्यांपासून पालकमंत्रीच मिळालेला नाही. दुसरीकडे रायगडचं पालकमंत्रिपद मिळण्याची मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांनी आशा आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून आतूर असलेल्या गोगावले आणि तटकरे यांच्या पदरी निराशा हाती लागत आहेत. याच पालकमंत्रिपदाबाबत मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

bharat gogawale News
Mumbai Coastal Road : मुंबईचा कोस्टल रोड की वॉटर पार्क? लोकांचा कोट्यवधीचा पैसा पाण्यात, पाहा व्हिडिओ

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गोगावले आणि तटकरे या दोन्ही नेत्यांच्या दाव्यामुळे महायुतीकडून रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत अधिकृत भूमिका घेतली जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेल्या ६ महिन्यापासून रायगडला पालकमंत्रिच लाभलेला नाही. आता रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत पत्रकार,माध्यमाने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विचारा असं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.

bharat gogawale News
Himachal Pradesh Flood : हिमाचलच्या धर्मशाळामध्ये पावसाचा धुमाकूळ; पुरात १५ ते २० जण वाहून गेल्याची भीती

मंत्री गोगावले म्हणाले, 'रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत माध्यमांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विचारा. आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सोपवलं आहे. ते घेतील तो निर्णय मान्य असेल'.

bharat gogawale News
Mumbai Gold Scam : मुंबईतील सराफ पेढीला तब्बल 13,00,00,000 रुपयांना गंडा; सेल्समनच निघाला चोर, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आदिती तटकरे यांचा उल्लेख मनातला पालकमंत्री असा केला असून यावर बोलताना जिल्ह्यात मनातला पालकमंत्री भरतशेठ असल्याचे उत्तर भरत गोगावले यांनी दिलं आहे. महायुतीच्या काळात जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक विकास झाल्याचे सांगताना हे कोणी नाकारू शकत नाही, त्यांनी जशी विनंती केली, तशी आम्ही सुद्धा विनंती केली असल्याचे गोगावले यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com