Breaking News

Mumbai Gold Scam : मुंबईतील सराफ पेढीला तब्बल 13,00,00,000 रुपयांना गंडा; सेल्समनच निघाला चोर, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai Crime News : मुंबईच्या बोरिवलीतील सराफी पेढीला कामगारानेच तब्बल १३ कोटींचा गंडा घातलाय.
mumbai crime
crime newsSaam tv
Published On: 

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : देशभरात सोने विक्री करणाऱ्या जे.पी. एक्सपोर्ट गोल्ड अँड डायमण्ड ज्वेलरी या सराफ पेढीला तब्बल 13.34 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पेढीत काम करणाऱ्या सेल्समननेच विक्रीसाठी दिलेले तब्बल 13 किलो सोने चोरी केल्याचा प्रकार बोरिवली परिसरात घडला आहे. याप्रकरणी कंपनीने एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर अवघ्या 72 तासातच तीन आरोपींना जुनागड गुजरात येथून अटक केली आहे.

जिग्नेश नाथाभाई कुछडिया, यश जिवाभाई ओडेदरा आणि नाथाभाई हरदासभाई कुछडिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना आज बोरिवली न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने आरोपींना 30 जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जे.पी. एक्सपोर्ट गोल्ड अॅण्ड डायमण्ड ज्वेलरी ही गुजरातची कंपनी गुजरातसह दक्षिण भारतात सोने विक्री करते. या कंपनीने त्यांचे सेल्स प्रतिनिधी अजय सुरेशभाई घागडा (२७ वर्षे) व त्याचा सहाय्यक जिग्नेश नाथाभाई कुछडिया,(१९ वर्षे) यांचेकडे घाऊक सोन्याचे दागिने विक्रीसाठी दिले.

या दोघांनी तामिळनाडू,आंध्रप्रदेश व कनार्टक या राज्यात सोन्याची विक्री केल्यानंतर मुंबईच्या बोरिवली पश्चिमेकडील कंपनीच्या फ्लॅटवर मुक्कामासाठी पोहोचले.यातील जिग्नेश नाथाभाई कुछडिया याने संधी साधून सोन्याच्या दागिन्यांनी भरलेल्या दोन सँग बॅग घेवून पळ काढला. सोन्याच्या बॅगा गायब असल्याचे लक्षात येताच अजय सुरेशभाई घागडा यांनी एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्यात दागिने चोरीची तक्रार दिली या तक्रारीवरून कलम ३०६ भा.न्या. सं २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

mumbai crime
Pune News : पुण्यात बुलडोझर पॅटर्न! महापालिकेने २४ अनधिकृत इमारती पाडल्या

गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त आनंद भोईटे आणि व.पो. नि. गणेश पवार यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथकांची नेमणूक केली.आरोपी हा गुजरातचा असल्याने त्याच्या पळण्याचा संभाव्य मार्ग असलेले रेल्वे मार्ग, रस्ता मार्ग व विमानतळ मार्ग या मार्गावर विशेष पथके पाठवून आरोपीचा शोध घेण्यात आला.

गुन्ह्याचे घटनास्थळ ते दहिसर चेकनाका ते तलासरी टोल नाका, पालघर ते वापी टोल नाका गुजरात ते पिठाडिया टोल नाका जुनागड गुजरात या संपूर्ण मार्गावरील ३२० सी.सी.टी.व्ही कॅमेरे, फास्टटॅग यंत्रणा तपासून आरोपी जिग्नेश कुच दिया हा त्यांचे वडील नाथाबाही कुचडिया व त्यांचा मित्र यश ओडेधारा यांच्यासह महिंद्रा थार या वाहनाने जुनागडच्या दिशेने पळून गेल्याचे निष्पन्न झाले.

mumbai crime
Maharashtra Politics : माझ्या खात्यावर ५० कोटी आले असतील, तर...; गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांचा बापच काढला

या वाहनाचा पाठलाग करून यश यास महिंद्रा थारसह ताब्यात घेतलं. यशची चौकशी केली असता त्याने जिग्नेश कुछडिया याची माहिती दिल्यानंतर त्यालाही ताब्यात घेतले. यानंतर नाथाभाई हरदासभाई कुछडिया याची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता त्यांनीही चोरी सुनियोजित कट रचून केली. नायाभाई हरदासभाई कुछडिया हा चोरी केलेले सोने हे कोठेतरी अज्ञात ठिकाणी लपवून परागंदा झालेचे स्पष्ट झाले.

गुजरात राज्यातील पोरबंदर, राजकोट, जामनगर, जुनागड या ठिकाणी मुंबई पोलीसांच्या विशेष तपास पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने सलग ७२ तास शोध मोहिम राबवून विशेष पोलीस पथकाने मानवी व तांत्रिक कौशल्याने शेतात लपून बसलेला मुख्य आरोपी नाथाभाई हरदासभाई कुछडिया यास सापळा रचून ताब्यात घेतले.

आरोपी नाथाभाई हरदासभाई याला ताब्यात घेतल्यानंतर माणिकवाडा येथील जंगलातून लपविलेले सोने पंचनाम्या अंतर्गत एकूण १११०७.०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व लगडी अंदाजे किंमत ११,०१,७१,०२७/-जप्त करण्यात आले आहे. या सर्व तीनही आरोपींची सिटी सिविल कोर्ट जुनागड यांच्याकडून ट्रांजिस्ट रिमांड घेतल्यानंतर आज तीनही आरोपींना मुंबईच्या बोरिवली महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीनही आरोपींना 30 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हस्तगत मालमत्ता

पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून १११०७.०५ ग्रॅम वजनाचे सोने (दागिने व लगडी) अंदाजे किंमत ११,०१,७१,०२७/- तसेच १ महिन्द्रा अॅन्ड महिन्द्रा कंपनीची थार मॉडेलची चारचाकी गाडी जिची अंदाजे कि. २०,००,०००/इतकी आहे.

mumbai crime
Wegovy Injection : झटपट वजन कमी करणारं वेगोवी इंजेक्शन भारतात मिळणार, किंमत ठरली

सदरचा तपास व.पो.नि. गणेश पवार, पो नि अतुल आव्हाड (गुन्हे), सपोनि बाबुलाल शिंदे,सपोनि गणेश तोरगल, सपोनि गणेश तारगे, स.पो.नि. वैभव सांळुखे,पो उप नि निलेश पाटील, पोउनि. संदिप गोरडे, पोउनि. वसिम शेख, पोउनि मंगेश किरपेकर, पोह साखरे, पोह.परीट, पोह.साळुंखे, पोह.देवकर, पो शि.क्र.आहेर, पोशि शरमाळे, पोशि मस्के,पो.शि.मोरे,पो.शि.मंजुळे यांच्या अथक परिश्रमाने करण्यात आला .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com