मोठी बातमी! मुंबईत वेश्या व्यवसायाचा भंडाफोड; पोलिसांनी अभिनेत्रीला रंगेहाथ पकडलं, २ अभिनेत्रींची सुटका

Mumbai Brothel Racket: मुंबईतील काशीमिरा परिसरात पोलिसांची कारवाई. अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास अटकेत. दोन बंगाली टीव्ही अभिनेत्रींची सुटका.
Actress Arrested
Actress ArrestedSaam Tv News
Published On
Summary
  • मुंबईतील काशीमिरा परिसरात पोलिसांची कारवाई.

  • अभिनेत्री अनुष्का अटकेत.

  • दोन बंगाली टीव्ही अभिनेत्रींची सुटका.

  • पोलिसांकडून रॅकेटमागील दलाल व नेटवर्कचा तपास सुरू.

सिनेसृष्टीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईजवळील काशीमिरा पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी अभिनेत्रीला अटक केली आहे. तसेच २ मालिकांमधील महिला कलाकारांची सुटका केली आहे. पोलिसांनी सापळा रचत आरोपींना रंगेहाथ पकडलं. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

अनुष्का मोनी मोहन दास (वय वर्ष ४१) असे अभिनेत्रीचे नाव आहे. मिरारोडच्या ठाकूर मॉलमध्ये हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरू होता. याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाली होती. सापळा रचून पोलिसांनी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आणले.

Actress Arrested
'आईवरून शिव्या देतोस..' मित्राने मित्रालाच संपवलं; चाकूने वार करत हत्या, नंतर घर पेटवलं

पोलिसांना सुरूवातील गुप्त माहिती मिळाली होती. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी २ बनावट ग्राहत तयार केले. आरोपींनी ग्राहकांना काशीमिरा येथील एका मॉलमध्ये बोलावून घेतले. पोलिसांनी सापळा रचला. यादरम्यान, आरोपींना पैसे घेत असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं.

Actress Arrested
नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजवर रंगेहाथ पकडलं, बायकोचा रौद्रावतार पाहून तरूणाची खाडीत उडी

अनुष्का मोनी मोहन दास या महिलेला ताब्यात घेतलं. पोलीस चौकशीत महिला बंगाली अभिनेत्री असल्याची माहिती मिळाली. तर, पोलिसांनी या प्रकरणात २ महिला टिव्ही कलाकारांची सुटका केली. पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतलं. तसेच आश्रयगृहात हलवलं. या प्रकरणी पोलिसांनी अभिनेत्रीविरोधात काशीमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. काशीमिरा पोलिसांनी सांगितले की, रॅकेटसंबंधित इतर व्यक्ती, दलाल आणि नेटवर्कबाबात तपास सुरू आहे.

Actress Arrested
Pune Ganpati Visarjan: लेझर लाईटवर बंदी, ढोल-ताशा अन्..., विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांकडून नियमावली जारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com