Pune Ganpati Visarjan: लेझर लाईटवर बंदी, ढोल-ताशा अन्..., विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांकडून नियमावली जारी

Pune Police strict rules for Ganesh Visarjan: पुणे पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. डीजे, फटाके, लेझर लाइट्स यावर संपूर्ण बंदी घालण्यात आली.
Pune Police strict rules
Pune Police strict rulesSaam
Published On
Summary
  • पुणे पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले.

  • फटाके, लेझर लाइट्स यावर संपूर्ण बंदी घालण्यात आली.

  • रात्री १२ वाजेपर्यंतच ध्वनिवर्धक परवानगी असेल.

  • नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा.

बघता बघता अनंत चतुर्थीचा दिवस जवळ आला. उद्या ११ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होईल. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे, बँड, ढोल ताशांचा वापर केला जातो. दरम्यान, काहींना डीजेच्या आवाजाचा प्रचंड त्रास होतो. आरोग्याच्या निगडीत गंभीर समस्या निर्माण होतात. काहींना कानाचा, ह्रदयाचा त्रास होऊन कायमचे अंपगत्व येते. तर, काहींच्या जीवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे यंदा मिरवणुकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी महत्वाचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

  • ध्वनिवर्धक : रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी.

  • ज्वालाग्राही पदार्थ : मिरवणुकीत वापरास सक्त मनाई.

  • आवाजाची पातळी : 'साउंड सिस्टीम' लावताना डेसिबल मर्यादांचे पालन बंधनकारक.

  • लेजर लाइटवर बंदी : डोळ्यांना होणारी इजा टाळण्यासाठी लेजर लाइटवर बंदी.

  • फटाके : सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालय परिसरात फटाक्यांवर बंदी.

  • ढोल ताशा पथक : गणेश मंडळास दोन ढोल ताशा पथकांनाच परवानगी. एकूण ६० वादकांची मर्यादा, स्थिर वादन करण्यास बंदी.

  • कायदेशीर कारवाई : आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार.

Pune Police strict rules
भीषण! भरधाव डंपरनं गर्भवतीला चिरडलं; अर्भक रस्त्यावर पडलं, महिलेचा दुर्देवी मृत्यू

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिस पूर्णपणे सज्ज झाले आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त,आठ हजार पोलिस तैनात

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शहर पोलीस दलाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्या सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणारी विसर्जन मिरवणूक परवा दिवशी दुपारपर्यंत सुरू राहील. या कालावधीत सुमारे आठ हजारांहून अधिक पोलिस अधिकारी,अंमलदार आणि होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात असतील.

Pune Police strict rules
जीएसटीत मोठा बदल! बाईक आणि स्कूटर खरेदीदारांसाठी खुशखबर; दुचाकी स्वस्त होणार?

मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संशयितांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त, पोलिस सह आयुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच, गुन्हे शाखेसह बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), शीघ्र कृती दल (क्यूआरटी) आणि केंद्र आणि राज्य राखीव पोलिस दलाची पथके मिरवणुकीदरम्यान सतत गस्त घालणार आहेत.

मिरवणुकीतील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रमुख मार्गांवरील चौकांमध्ये पोलिस मदत केंद्र असतील. गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथके असतील. सोनसाखळी व मोबाईल चोरीचे प्रकार टाळण्यासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. तसेच, सर्व लॉजेस, हॉटेलची तपासणी करून संशयितांवर लक्ष ठेवले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com