आयुष्यभर पंढरीची वारी करणाऱ्या १५ ज्येष्ठांच्या पायी नतमस्तक! कामशेतमध्ये रंगला भक्तीमय सोहळा

Pandharpur Wari : कामशेतमध्ये ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळ्यात पवन, नाणे आणि अंदर मावळ परिसरातील आयुष्यभर पंढरीची वारी करणाऱ्या १५ ज्येष्ठ वारकरी महाराजांचा सन्मान करण्यात आला.
15 senior Warkaris honoured in Kamshet
15 senior Warkaris honoured in Kamshet
Published On

दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी

पंढरीच्या वाटेवर वर्षानुवर्षे पायी चालत, ऊन-पाऊस-वारा सोसत, मुखी विठ्ठलाचे नाम आणि हृदयात अखंड भक्तीचा दीप तेवत ठेवणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्यांच्या त्याग, समर्पण व भक्तीला कृतज्ञतेची मानवंदना देण्यात आली. 'कामशेत ग्रामीण पत्रकार संघ, मावळ' यांच्या वतीने आयोजित ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

पवन मावळ, नाणे मावळ आणि अंदर मावळ परिसरातील वारीची अखंड परंपरा जपणाऱ्या १५ ज्येष्ठ वारकरी महाराजांना ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास उद्योजक शंकरराव शेळके, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, ह.भ.प. दत्तात्रय लालगुडे, प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष संतोष कुंभार, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रामदास वाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

15 senior Warkaris honoured in Kamshet
Maharashtra News Live Update: Yavatmal: महागाव ग्रामीण रुग्णालयातील राडा प्रकरणी आठ आरोपींना अटक

वारी ही केवळ पंढरीकडे जाणारी पाऊलवाट नसून, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, समतेचा, बंधुभावाचा आणि माणुसकीचा अखंड प्रवाह आहे. या प्रवासाला आपल्या आयुष्याची अनेक वर्षे अर्पण करणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या सेवेला समाजाच्या वतीने कृतज्ञतेची मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमास वारकरी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

15 senior Warkaris honoured in Kamshet
Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

कार्यक्रमाच्या शेवटी सन्मानित झालेल्या वारकरी महाराजांनी आपल्या भावना व्यक्त करताना, या पुरस्कारामुळे विठ्ठलभक्तीचा आणि वारीच्या परंपरेचा सन्मान झाल्याची भावना व्यक्त केली. कामशेत ग्रामीण पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या या उपक्रमाचे संपूर्ण मावळ परिसरातून कौतुक होत आहे. पसायदानाने आणि महाप्रसादाने या भक्तीमय सोहळ्याची सांगता झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com