Maharashtra News Live Update: Yavatmal: महागाव ग्रामीण रुग्णालयातील राडा प्रकरणी आठ आरोपींना अटक

Marathi Breaking Live Headlines Updates : आज रक्षाबंधन सण, राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, मराठा आंदोलन, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On

Yavatmal: महागाव ग्रामीण रुग्णालयातील राडा प्रकरणी आठ आरोपींना अटक

यवतमाळच्या महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला धक्काबुक्की करित राडा घालून तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी आठही आरोपींना अटक केली. ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. अटकेनंतर सर्व आरोपींना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सूचना पत्रावर सोडण्यात आहे.दरम्यान कायद्याचा धाक आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी पोलीस प्रशासनाची धडाकेबाज कारवाईची नागरिकांमधून कौतुक होते आहे.

अमवरावती येथील आदिवासी समाजाचे विद्यार्थी बाभुळगांवात दाखल

यवतमाळ जिल्ह्यात अमरावतीचे आंदोलक विद्यार्थी पायदळ दाखल, आंदोलक विद्यार्थ्यांची बाभुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत जेवण्याची व्यवस्था

मध्यरात्री उशीरा आदिवाशी विकास मंत्री अशोक उईक करणार आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा

आदिवासी विकास मंत्री आणि आंदोलक विदायार्थ्यांमध्ये चर्चेतून तोडगा निघणार का याकडे लागले लक्ष

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यात गावबंधाची हाक

मनोज जरांगे पाटील यांच्या उद्याच्या अंतर्वली सराटी येथील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील सर्व मराठा बांधवांनी अंतरवली सराटीकडे यावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना केले आहे या आव्हानाला साद घालत मराठा समाज बांधवांकडून बीड जिल्ह्यातील सर्वच गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे 80 टक्के होऊन अधिक गाव बंद ठेवून मराठा बांधव अंतरवाली सराटीत दाखल होणार आहेत या अगोदर व्हाट्सअप ग्रुप वरती गाव बंद चे मेसेज करत आहे त्याचबरोबर सोशल मध्यमान वरती बॅनर देखील टाकण्यात आले असून चलो अंतरवलीचा नारा दिला आहे.

नागपूरचे 106 लोक अनेक अडथळे पार करत सध्या सीतामढी (बिहार) येथे पोहोचले

नागपूर अपडेट

नागपूरचे 106 लोक अनेक अडथळे पार करत सध्या सीतामढी (बिहार) येथे पोहोचले आहेत.

तेथे त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मुख्यमंत्री कार्यालय बिहार यांनी केली आहे.

राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय सातत्याने त्यांच्या संपर्कात

उद्याच्या ट्रेन मध्ये पटणावरून ते नागपूरला निघतील.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे कार्यालय सुद्धा त्यांना मदत करत आहे.

पुणे महापालिकेच्या स्थापत्य अभियंता परीक्षेत फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल..

या प्रकरणी ५ जणांवरून गुन्हा दाखल यामध्ये तीन परीक्षा उमेदवार आणि दोन कर्मचारी जे टी सी एस मधील परमनंट कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिखलठाणा या केंद्रावर हा प्रकार घडला आहे

पुणे महापालिकेच्या वतीने आय बी पी एस ने २२,२३ ,२९,३० जून २०२६ परिक्षा झाल्या

एक व्हिडिओ टेलिग्राम व्हिडीओ फिरत होता,याची आम्ही तपासणी करा अशी मागणी होत होती

५४५ जे लोक आहेत त्याची तपासणी केली, आय बी पी एस ने तपास करून रिपोर्ट दिला,त्यांनी घेतल्या होत्या परीक्षा,त्यांनी TCS ला परीक्षा घेतल्या.

प्रत्येक प्रश्न आणि उत्तर ज्मलिंग असतात.५४५ लोकाचे लाँग अनलाईज केले

यातील तिघे लोक बाथरूम मध्ये गेले,त्यांनी परत आले त्यात प्रश्न

मोडस बद्दल आय बी पी एस ने सागितले आहे.बाथरूम मध्ये मोबाईल मिळाला आहे.डोळ्यात कॅमेरा ठेवून ते केले असाव असे आम्हाला वाटते

शेवटच्या अर्ध्या तासात पेपर सोडवला असल्याचे माहिती

रक्षाबंधना निमित्ताने श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

राखी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस आकर्षक, पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले आहे. तसेच विठुरायाला राखी बांधण्यात आली आहे. या पारंपरिक अलंकारांमुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रूप अधिक विलोभनीय दिसून आले.

गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित अंतरवाली सराटीत दाखल

मनोज जरांगे पाटील उद्यापासून आमरण उपोषण करणार आहे

त्यापूर्वी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित अंतरवाली सराटीमध्ये मनोज जारंगे यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहे

वर्ध्यातील ‘ ब्लिंक इट’ आणि ‘कांचन फूड्स अँड बेव्हरेजेस’वर अन्न प्रशासनाची मोठी कारवाई

- दोन्ही खाद्य आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित

- अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन आढळल्याने कारवाई

- ब्लिंक इट, बॅचलर रोड, वर्धा येथील आस्थापनाच्या तपासणीत अस्वच्छता आढळली

- सुधारणा नोटीस देऊनही अपेक्षित सुधारणा न केल्याने परवाना निलंबित

- कांचन फूड्स अँड बेव्हरेजेस, मौजा भिडी येथेही गंभीर अनियमितता उघड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोटद्वारे सिंहस्थ कुंभमेळा सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम कार्यक्रमाचं उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भक्ती संगम कार्यक्रम स्थळी दाखल

- कार्यक्रम स्थळी महिला वर्गांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि इतर मंत्री यांना बांधण्यात आली राखी

- मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाशिक महानगरपालिकेच्या साठी नव्याने आलेल्या 50 इ बस चे आणि अग्निशमन दलात नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक अशा वाहनाचे उद्घाटन संपन्न

- सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार उद्घाटन

- 3 दिवस पार पडणार विविध कार्यक्रम

गडचिरोलीत आत्मसमर्पित ७० महिला माओवाद्यांनी पोलिसांना बांधली राखी

गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांसोबत पोलिसांनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवजीवन वसाहत, नवेगाव येथे हा कार्यक्रम पार पडला. गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात ७० आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्य सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या महिलांना विश्वास आणि सुरक्षिततेची भावना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

रक्षाबंधनाच्या दिवशी गरोदर मातेची फरफट; पूल नसल्याने पुरातून कावडीतून जीवघेणा प्रवास

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या रक्षणाचा संकल्प केला जात असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कोईंदुळ गावातील एका गरोदर मातेला मात्र रुग्णालय गाठण्यासाठी अक्षरशः जीवघेणा संघर्ष करावा लागलानाल्यांवर पूल नसल्याने आणि पुरामुळे रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू न शकल्याने ग्रामस्थांनी या गरोदर महिलेला कावडीतून पुराचे पाणी पार करून नदीपलीकडे नेले.

रक्षाबंधना निमित्त पुसद ग्रामीण पोलिसांचा कौतुकास्पद उपक्रम

रक्षाबंधनाच्या औचित्याने यवतमाळच्या पुसद ग्रामीण पोलिसांनी कौतुकास्पद उपक्रम राबविला. तांत्रिक तपास व डिजिटल साधनांच्या मदतीने हरवलेले तसेच गहाण झालेले मोबाईल शोधण्यात आले. पोलिस अधिकारी व अंमलदारांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून जिल्ह्यातून तसेच परराज्यातून तब्बल वीस मोबाईल, अंदाजे दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे, शोधून काढण्यात आले. हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.

मंत्री संजय राठोड यांना राखी बांधण्यासाठी बहिणींची झुंबड

यवतमाळमध्ये रक्षाबंधन निमत्त पालकमंत्री संजय राठोड यांना राखी बांधण्यासाठी लाडक्या बहिणींनी झुंबड केली. त्यांना राखी बांधून त्यांचे औक्षण करण्यात आले. संजय राठोड हे गेल्या 25 वर्षांपासून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करत आहेत.

अंतरवाली सराटीत उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण; ग्रामस्थांची जोरदार तयारी

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणाची तयारी पूर्ण झाली आहे. उपोषणासाठी येणाऱ्या मराठा बांधवांसाठी ग्रामस्थांकडून चार ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर परिसरात जोरदार तयारी सुरू असून, येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यासाठी अंतरवाली सराटीसह गोदापट्ट्यातील १२३ गावांतील नागरिक सज्ज असल्याची प्रतिक्रिया अंतरवाली सराटी ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे उद्याच्या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिक शेतीतील प्रगत जिल्हा - देवेंद्र फडणवीस

नाशिक शेतीतील प्रगत जिल्हा - देवेंद्र फडणवीस

नाशिकमधील शेतीची क्रांती अतिशय विलक्षण

देशात ८०% द्राक्षे निर्यात नाशिकमधून

नारळी पौर्णिमेनिमित्त पंढरपुरात कोळी बांधवांची शोभायात्रा

पंढरपूर शहरात नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी समाज बांधवांच्या वतीने पारंपरिक उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे शोभायात्रेने नागरिकांचे लक्ष वेधले. शोभायात्रा चंद्रभागा नदीकाठी पोहोचल्यानंतर कोळी बांधवांनी नदीच्या पाण्याची विधिवत पूजा केली. नारळ अर्पण करून नदीमातेचे पूजन करण्यात आले. जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करत सुख-समृद्धी आणि सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाचा महत्त्वाचा सण असून, जलस्रोतांची पूजा करण्याची परंपरा आहे.

नाफेड-एनसीसीएफचा कांदा चेन्नईकडे रवाना; मनमाडहून रेल्वेने लोडिंग सुरू

केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा आता परराज्यात पाठवण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी अटी-शर्तींमुळे संस्थांना कांदा न देता व्यापाऱ्यांना विकला. त्यामुळे नाफेड-एनसीसीएफने इतर ठिकाणांहून हलक्या प्रतीचा आणि कमी आकाराचा कांदा खरेदी केल्याचे समोर आले आहे. लासलगावनंतर आता मनमाडहूनही हा कांदा रेल्वेने चेन्नईकडे पाठवण्यासाठी लोडिंग सुरू झाले आहे.

सुजय विखेंनी स्वच्छता कर्मचारी महिलांसोबत सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण

राहाता पालिकेतील स्वच्छता कर्मचारी महिला आणि महिला नगरसेविकांनी भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.. नगरसेविकेपासून रस्त्यावर स्वच्छता करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येक भगिनीला माझ्यात तिचा भाऊ किंवा कुटुंबातील व्यक्ती दिसते, ही माझ्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयात रक्षा बंधन उत्सव साजरा करण्यात आला

- भय्याजी जोशी,अखिल भारतीय प्रचार सहप्रमुख प्रदीप जोशी,प्रांत प्रचारक गणेश शेटे यांच्या उपस्थितीत रक्षा बंधन करण्यात आले

- यावेळी भारत-तिबेट सहयोग मूव्हमेंट आणि भाजप युवा मोर्चाच्या भगिनींनी आरएसएसच्या नेत्यांना राखी बांधली

लाडक्या बहिणींचे १५०० ऐवजी ३ हजार रुपये करा, रक्षाबंधनानिमित्त आमदार रवी राणांची मुख्यमंत्र्यांकडे  मागणी

लाडक्या बहिणींचे १५०० ऐवजी ३ हजार रुपये करा, रक्षाबंधनानिमित्त आमदार रवी राणांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी...

'वेळ पडल्यास आमदार-खासदारांचे पगार कमी करा, रवी राणांच्या कार्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्त पोलिस यंत्रणा अलर्ट

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्त पोलिस यंत्रणा अलर्ट...

लासलगावात ठाकरे गटाच्या नेत्याला केले स्थानबद्ध...

सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना बजावल्या नोटिसा..

रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वावर भाजपा आमदार सुरेश धस यांनी जपला आपुलकीचा स्नेहबंध

रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वावर भाजपा आमदार सुरेश धस यांनी जपला आपुलकीचा स्नेहबंध.

गोरगरीब, वंचित व भटक्या-विमुक्त भगिनींसोबत आ.सुरेश धस यांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण

भाजप ची राज्य कार्यकारणी ३१ ऑगस्ट रोजी पुण्यात पार पडणार

भाजप ची राज्य कार्यकारणी ३१ ऑगस्ट रोजी पुण्यात पार पडणार

राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह मंत्री मंडळातील सर्व भाजप चे मंत्री, नेते, आमदार, खासदार उपस्थित राहणार

गणेश कला क्रीडा रंग मंदिरात होणार कार्यकारणी

मंत्री पंकजा मुंडे , आदिती तटकरे यांनी आ.धनंजय मुंडेना बांधली राखी

मंत्री पंकजा मुंडे , आदिती तटकरे यांनी आ.धनंजय मुंडेना बांधली राखी.

बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणून ओळख असलेल्या राखी पौर्णिमेनिमित्त मुंबई येथे मंत्री पंकजा मुंडे आणि आदिती तटकरे यांनी आ.धनंजय मुंडे यांना राखी बांधली.

यावेळी दोघींचा उत्तरोत्तर प्रगतीचा आलेख वृद्धिंगत व्हावा आणि जनतेची कायम सेवा घडावी, असा आशीर्वाद धनंजय मुंडे यांनी दिलाय.

डेंग्यू-चिकुनगुनिया रोखण्यासाठी कर्मचारी नेमा, महापालिकेच्या आरोग्य विभागाला सूचना

पुणे शहरातील डेंग्यू चिकुनगुनियाचा वाढता वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन डास नियंत्रणासाठी प्रस्तावित अतिरिक्त २६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्तीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा, अशा सूचना 'स्थायी'च्या बैठकीत आरोग्य विभागाला देण्यात आल्या

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौरा

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे

सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे

मनोज जरांगे यांच्या उपोषणाची तयारी पूर्ण, उपोषणासाठी मंडप तयार

मनोज जरांगे यांच्या उपोषणाची तयारी पूर्ण, उपोषणासाठी मंडप तयार...

58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक

पीठढवळ नदीत तरुण गेला वाहून; कालपासून शोधकार्य

मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या हुमरमळा-ओरोस येथील पीठढवळ नदीत काल संध्याकाळी एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. काल नारळी पौर्णिमा असल्याने पीठढवळ नदीवरील पुलावर नागरिकांनी नारळ अर्पण करण्यासाठी गर्दी केली होती.

नागपूर जिल्ह्यातील नेपाळमध्ये अडकलेले पर्यंटक चार बसने भारताकडे निघाले

- नागपूर जिल्ह्यातील नेपाळमध्ये अडकलेले पर्यंटक चार बसने भारताकडे निघाले

- लवकरंच नागपूरातील पर्यटक भारतात परतणार असल्याची माहिती

- श्री स्वामी महाराज यांच्या समूहासोबत नेपाळमध्ये गेलेले ११० नागरिक सुरक्षित

एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांकडनं तपासाला गती

एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांकडनं तपासाला गती....

सहा आरोपींच्या अटकेनंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर....

स्पॉट पंचनामासाठी मुंबई स्थानिक गुन्हे शाखेचे 5 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पोलीस पथक नंदुरबार मध्ये दाखल....

मुंबई पोलिसांच्या पथकाकडून नंदुरबार मध्ये आरोपींची घरे आणि कौटिल्य अकॅडमीचे केले जाणार स्पॉट पंचनामे

Nagpur: नागपुरातील सुमारे ४०० वर्ष पुरातन कल्याणेश्वर मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा

नागपूर -

- नागपुरातील सुमारे ४०० वर्ष पुरातन आणि ऐतिहासिक कल्याणेश्वर मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा.

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिराच्या आराखड्याला दिली मंजुरी.

- कल्याणेश्वर मंदिराच्या विकासामुळे शहराच्या ऐतिहासिक वैभवात आणि पर्यटनात मोठी भर पडणार.

- भोसले कालीन सीनियर आणि ज्युनिअर भोसले पॅलेसच्या जवळील कल्यानेश्वर मंदिर हे भाविकांचे मोठे श्रद्धास्थान.

Nandurbar: नंदुरबार शहर पोलिसांची मोठी कारवाई, 2.59 लाखांचा गांजा आणि अवैध दारू जप्त

नंदूरबार -

नंदुरबार शहर पोलिसांची मोठी कारवाई

2.59 लाखांचा गांजा आणि अवैध दारू जप्त

पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे व पथकाने कंजरवाडा येथे सापळा रचला.

संशयित ईश्वर शिवधन गुमाने याच्या घरावर छापा टाकला

5 किलो सुका गांजा,82 लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि बिअरच्या बाटल्या असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

संशयिताविरुद्ध एनडीपीएस आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

Pune: आज सरकारने जीआर हाती दिला नाही तर 600 विध्यार्थी करणार सामूहिक उपोषण? सरकारला इशारा

पुणे -

- आज सरकारने जीआर हाती दिला नाही तर 600 विध्यार्थी करणार सामूहिक उपोषण? सरकारला इशारा

- आदिवासी विद्यार्थ्यांच्या सरकार कडून मागण्या मान्य....

- मागण्यांचा जीआर हातात न मिळाल्याने सोळाव्या दिवशी देखील उपोषण सुरू.....

- सरकारला दिलेली दोन दिवसाची मुदत आज संपली

Pune: पुण्यातील भोरमध्ये तरुणाची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं

पुणे

पुण्याच्या भोर तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गालगत असणाऱ्या सारोळा गावात

एका तरुणावर दुसऱ्या एका तरुणाकडून चाकूने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना

संबंधित तरुण एक महिला आणि लहान मुलासह रस्त्याने जात असताना, दुसऱ्या एका तरुणाने अचानक मागून येत त्याच्यावर चाकूने सपासप वार केले.

यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला

काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली

घटनेची माहिती मिळताच भोरच्या राजगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली

स्थानिक तरुणांच्या मदतीने खून करणाऱ्या वक्तीला पाठलाग करून ताब्यात घेतलं

Beed: वाल्मीक कराडच्या समर्थकांकडून जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न

बीड -

वाल्मीक कराडच्या समर्थकांकडून जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न

शेतकऱ्यांनी रोखल्याने तिघांना लोखंडी सळई, दगड आणि लाकडी काठीने मारहाण

Nandurbar: नंदुरबार शहरातील खड्ड्यांच्या विरोधात हातात तिरंगा घेऊन तरुण उतरले रस्त्यावर

नंदुरबार -

शहरातील खड्ड्यांच्या विरोधात हातात तिरंगा घेऊन तरुण उतरले रस्त्यावर

शहादात शहरातील तरुणांचं अनोख खड्डे दर्शन आंदोलन

जीवघेण्या खड्ड्यांभोवती पांढऱ्या पावडरने ठळक गोल आखून प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

Sangli:  जत तालुक्यात भीषण पाणी  टंचाई, पाणी द्या अन्यथा रस्त्यावर उतरू, शेतकऱ्याचा इशारा

सांगली - जत तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई

पाणी द्या अन्यथा रस्त्यावर उतरू

संतप्त शेतकऱ्याचा प्रशासनाला इशारा

Dharashiv: शिवसेना ठाकरे पक्ष सोडून पक्षांतर केलेल्या 13 नगरसेवक आणि 4 पंचायत समिती सदस्यावर कायदेशीर कार्यवाही करणार

धाराशिव -

शिवसेना ठाकरे पक्ष सोडून पक्षांतर केलेल्या 13 नगरसेवक आणि 4 पंचायत समिती सदस्यावर कायदेशीर कार्यवाही करणार

मशाल चिन्हावर निवडून आलेले सदस्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणार दाद

जिल्हाधिकारी यांनी निर्णय न दिल्यास सर्वोच्च न्यायालयाची जाणार आमदार कैलास पाटील यांचा इशारा

आमदार कैलास पाटील यांनी ही भूमिका घेतल्याने पक्षांतर केलेल्या ठाकरे गटाच्या कळंब च्या 9 धाराशिव च्या 4 नगरसेवकात खळबळ

Pune: विनापरवाना ऊस गाळप केल्यास कारवाई, साखर आयुक्तांचा कारखान्यांना इशारा

पुणे -

विनापरवाना ऊस गाळप केल्यास कारवाई, साखर आयुक्तांचा कारखान्यांना इशारा

२०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामासाठी ऑनलाइन गाळप परवान्यांचे अर्ज १ सप्टेंबरपासून स्वीकारले जाणार आहेत.

परवाना मिळाल्याशिवाय सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी गाळप सुरू करू नये, अशा सूचना साखर आयुक्तांनी दिल्या आहेत.

मागील हंगामातील उसाचे शंभर टक्के बिल शेतकऱ्यांना दिलेले असणे बंधनकारक आहे.

विनापरवाना गाळप सुरू केल्यास संबंधित कारखान्यावर कारवाई केली जाणार आहे.

Dharashiv: मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी धाराशिव मधून 5000 रिक्षांची रॅली जाणार

धाराशिव -

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी धाराशिव मधून 5000 रिक्षांची रॅली जाणार

अंतरवाली येथील आंदोलनासाठी लाखो मराठा बांधव सहभागी होतील, मनोज जरांगे पाटलांनी मुंबईचा आदेश दिला तर मुंबई जाम करू

आंदोलनासाठी मराठा बांधवांची बैठक

Raigad: कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य

कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य; कळंब जवळ वाहनचालकांची जीवघेणी कसरत

‎पावसाळा आला की कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील कळंबचा हा वळणदार रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात सापडतो, यंदाही त्याला अपवाद ठरला नाही.

कळंब पोलीस स्टेशनच्या पुढील धोकादायक वळणावर सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत.

Solapur: सोलापूरमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवण्यात आल्या १ लाख राख्या

सोलापूर -

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवण्यात आल्या एक लाख राख्या

सोलापूर जिल्ह्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तब्बल एक लाख राख्या पाठवण्यात आल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी या राखा पाठवल्या आहेत.मागील आठ दिवसांपासून या राख्या जमा करण्याचे काम सुरु होते.

'शिवसेनेची राखी' उपक्रमाअंतर्गत हे राख्या जमा करण्याचे काम करण्यात आले.

प्रकाश राठोड यांनी हा सर्व उपक्रम राबवण्यात पुढाकार घेतला आहे.

Pune: साखरेचा दर 1500 रुपयांनी घसरला

पुणे -

- साखरेचा दर 1500 रुपयांनी घसरला

- साखरेच्या कृत्रिम तेजीला एका आठवड्यातच लागला लगाम...

- 64 रुपये किलो पोहचलेले दर सुमारे 48 रुपये किलोवर...

- साखरेचे दर घसरल्याने साखरेचा तुटवडा नसल्याचेही स्पष्ट

- राज्य व राष्ट्रीय साखर संघांनी पुरेशी साखर शिल्लक असल्याचे केले स्पष्ट

Yavatmal: शेतात काम करताना ५ शेतकऱ्यांना विजेचा धक्का लागला, एकाचा मृत्यू 

यवतमाळ -

विद्युत खांबाचा पाच शेतकऱ्यांना वीजचे धक्का लागला

एकचा जागीच मृत्यू तर चार जण जखमी

नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील घटना

शेत शिवारात अतिवृष्टीमुळे वाकलेले विद्युत खांब सरळ करताना पाच शेतकऱ्यांना लागला विजेचा धक्का एकाच मृत्यू तर चार जण जखमी

यवतमाळच्या नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील घटना

Pune: पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा संताप, अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये पैशांची प्रतीकात्मक उधळण

पुणे -

पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा संताप, अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये पैशांची प्रतीकात्मक उधळण

पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत ठेकेदारांच्या पात्रता व अपात्रतेबाबत गंभीर विसंगती आढळून आल्याच्या निषेधार्थ आज पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या युवक उपाध्यक्ष यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन निविदा प्रक्रियेतील विसंगतींबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com