Nagar Crime News : न्यू आर्ट्स कॉलेज समोर राडा, तरुणावर कोयता हल्ला; पाेलिस घटनास्थळी दाखल

या घटनेमुळे युवा वर्ग काेणत्या दिशेने चालला आहे अशी चर्चा नागरिकांत हाेती.
nagar , Crime News
nagar , Crime NewsSaam TV
Published On

- सुशिल थाेरात

Nagar Crime News : नगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून आणि मारामारी या सारख्या घटना वाढल्या आहेत. गेल्या तीन महिन्यात तीन खून झाल्याने शहरात गुन्हेगारीने डोकेवर काढले का असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आज पुन्हा नगर शहरातील न्यू आर्ट्स कॉलेजच्या समोर एका तरुणावर कोयत्याने हल्ला झाला. (Maharashtra News)

nagar , Crime News
Congress आमदारासह 52 जणांवर गुन्हा दाखल, Sambhaji Bhide यांच्या अटकेसाठी छेडलं हाेतं आंदाेलन

कोयत्याने हल्ला झाल्याने महाविद्याल परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ला झालेल्या तरुणाचे नाव युवराज गुंजाळ असे आहे. ताे या घटनेत गंभीर जखमी (injured) झाला आहे. त्याला नगर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

nagar , Crime News
Pavana Dam Water Level : पवना धरण 90 टक्के भरले, शेतीसह पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

नगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि भरवस्तीत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या कॉलेज समोर हा हल्ला झाल्याने कॉलेज मधील विद्यार्थ्यांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी देखील हा प्रकार काय आहे अशी चर्चा सुरु केली.

nagar , Crime News
Karjat Jamkhed MIDC : आमदार राेहित पवारांचा ड्रीम प्राेजेक्ट ग्रामसभेने नाकारला

ही घटना समजताच तोफखाना पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर पसार झाले असून ते कोण होते याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. शहर वाहतूक बस (bus) मध्ये सीटवर बसण्याच्या कारणातून वाद झाल्यानंतर हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com