Karjat Jamkhed MIDC : आमदार राेहित पवारांचा ड्रीम प्राेजेक्ट ग्रामसभेने नाकारला

आता गावात दोन गट असल्याचे समोर आले आहे.
Rohit Pawar, Karjat Jamkhed MIDC
Rohit Pawar, Karjat Jamkhed MIDCSaam tv

- सुशिल थाेरात

Karjat Jamkhed News : कर्जत जामखेड एमआयडीसी (Karjat Jamkhed MIDC) प्रकरणाला आता एक वेगळेच वळण लागल्याचे चित्र आहे. या एमआयडीसीला पाटेगाव ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. ग्रामस्थांचा हा विराेध आमदार रोहित पवार (mla rohit pawar) यांना मोठा धक्का मानला जात आहे. (Maharashtra News)

Rohit Pawar, Karjat Jamkhed MIDC
Satara News : ज्येष्ठ विचारवंत डाॅ. आ. ह. साळुंखेंची 12 ऑगस्टला बीजतुला : अभिनेते सयाजी शिंदे

कर्जत जामखेड (karjat jamkhed news) तालुक्यातील एमआयडीसी करण्याबाबत सध्या चांगलाच राजकीय धुरळा उडाला. या एमआयडीसीच्या प्रश्नाबाबत कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. या एमआयडीसीच्या प्रश्नांसाठी त्यांनी थेट मंत्रालयाच्या बाहेर उपोषणही सुरू केले होते. मात्र उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

Rohit Pawar, Karjat Jamkhed MIDC
K Chandrasekhar Rao : अण्णा भाऊ साठेंचा देशात उचित गाैरव झाला नाही : मुख्यमंत्र्यांची खंत (पाहा व्हिडिओ)

त्यानंतर या प्रकरणात विधान परिषदेचे आमदार राम शिंदे (mla ram shinde) यांनीही उडी घेतली. राम शिंदे हे कर्जत जामखेडचे माजी आमदार असून एमआयडीसी प्रश्नाबाबत बोलत असताना एमआयडीसीची अधिग्रहण करण्यात येणारी ही जमीन फरार हिरे व्यापारी निरव मोदीची असल्याचा गौप्यस्फोट केला.

त्यामुळे या प्रकरणात पुन्हा एकदा चांगला राजकीय गदारोळ झाला होता. ही चर्चा क्षमते नाही तोच आता ज्या ठिकाणी एमआयडीसीची उभारणी होणार आहे त्या पाटेगाव परिसरामधील नागरिकांनी या एमआयडीसी उभारण्यास विरोध (pategaon grampachayat opposes karjat jamkhed midc project) केला आहे.

Rohit Pawar, Karjat Jamkhed MIDC
Nilesh Rane News : वैभव नाईक मुख्यमंत्र्यांना गुपचुप भेटतात, निलेश राणेंचा गौप्यस्फोट

तुटपुंजा मोबदला कशासाठी घ्यावा

पाटेगाव परिसरातील अनेक शेतांमध्ये फळांच्या बागा असल्याने या परिसरात चांगले उत्पन्न होत आहे. त्यामुळे चांगली जमीन देऊन जर सरकार आम्हाला तुटपुंजा मोबदला देत असतील तर आम्हाला पैसे नको अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

मर्यादित राेजगार मिळेल

एमआयडीसी आल्याने उद्योग धंद्या वाढीबरोबर तरुणांना रोजगार मिळेल. त्यामुळे एमआयडीसी होणे गरजेचे असल्याचे आमदार रोहित पवार सांगत असले तरी या परिसरातील अनेक तरुण दहावी ते बारावी पास असून त्यापेक्षा कोणीही उच्च शिक्षित नसल्याने एमआयडीसी झाली तरी येथील तरुणांना कामाची संधी कमी प्रमाणात भेटेल. त्यामुळे आम्हाला आमची शेती चांगली आहे. आम्हाला एमआयडीसीचे काम नको अशी भूमिका पाटेगाव मधील तरुणांनी व्यक्त केले आहे.

Rohit Pawar, Karjat Jamkhed MIDC
Pregnant Women Story : गर्भवती महिलेला बांबूच्या झोळीतून न्यावे लागले नदीतून खांद्यावर; हे पाहून शिंदे फडणवीस सरकारला पाझर फुटणार का? (पाहा व्हिडिओ)

पाटेगावलाच व्हावी म्हणुन हट्ट करणा-या आमदार रोहीत पवारांना हा मोठा धक्का असून पाटेगाव ग्रामस्थांनी (villagers) ग्रामसभा घेत पाटेगावमध्ये एमआयडीसीला विरोध करत एकमताने ठराव मंजुर केला आहे.

पाटेगाव ग्रामपंचायतीत नऊ सदस्य आहेत. त्यामधील पाच सदस्यांनी एमआयडीसी विरोधात मत दर्शवले आहे तर चार सदस्यांनी आपली भूमिका जाहीर केली नाही. सरपंच सुद्धा एमआयडीसी होण्याच्या विरोधात नसल्याने गावात दोन गट असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे अगोदरच नीरव मोदीच प्रकरण गाजत असताना पाटेगाव ग्रामस्थांच्या भुमिकेमुळे नवीन अडचण निर्माण झाली आहे. त्याच प्रमाणे आमदार रोहीत पवार समर्थकांनीही ठरावाला संमती दिल्याने पाटेगाव एमआयडीसी प्रकरणाला वेगळच वळण लागलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com