Pavana Dam Water Level : पवना धरण 90 टक्के भरले, शेतीसह पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

पुणे जिल्ह्यातीलही विविध धरणात पाणीसाठा उत्तम झाला आहे.
Pavana Dam, maval news
Pavana Dam, maval newssaam tv
Published On

Maval News : मावळात पावसाचा जोर कमी झाला आहे. तरी तालुक्यातील सिंचन आणि पिण्यासाठी लागणारे पाणी धरणात मुबलक उपलब्ध असल्याने वर्षभराची चिंता मिटली आहे. सध्या पवना धरणात 89.82 टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील चारही धरणांत मागील 15 दिवसांपासून चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. (Maharashtra News)

Pavana Dam, maval news
K Chandrasekhar Rao : अण्णा भाऊ साठेंचा देशात उचित गाैरव झाला नाही : मुख्यमंत्र्यांची खंत (पाहा व्हिडिओ)

पवना धरणात (pavana dam) गतवर्षी आजच्या तारखेला 81.30 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. यंदा 89.82 टक्के पाणीसाठा झाला आहे. पवना धरणात गत 24 तासांत 1.84 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान नव्वद टक्के धरणात पाणीसाठा झाल्याने धरणाचे दरवाजे कधीही उघडून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. पवना नदीकाठी असणाऱ्या सर्व नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Pavana Dam, maval news
Congress ची घाेषणा, Sambhaji Bhide यांच्या ताेंडाला काळे फासणा-यास 1 लाखांचे बक्षीस

पुणे जिल्ह्यातील 4 धरणांत (Pune Dam Water Level) मागील 15 दिवसांपासून चांगला पाणीसाठा जमा झालेला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरणांत एकुण 21.34 टीएमसी एवढं पाणी जमा झालं आहे.

यामुळे आता शेतीच्या पाण्याची आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. एकुण 81.21 टक्के इतका पाणीसाठा सद्यस्थितीला जमा झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com