Yavatmal Accident: भरधाव टिप्परनं दोघांना चिरडलं; होमगार्डची तयारी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

Yavatmal Accident: यवतमाळच्या पुसदमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये होमगार्ड भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा समावेश होता.
YAVATMAL ACCIDENT: SPEEDING TIPPER KILLS TWO, HOME GUARD ASPIRANT DIES
YAVATMAL ACCIDENT: SPEEDING TIPPER KILLS TWO, HOME GUARD ASPIRANT DIESSaam TV Marathi
Published On
Summary
  • यवतमाळच्या पुसद-माहूर रोडवर भीषण अपघात.

  • भरधाव टिप्परने दोन दुचाकीस्वारांना चिरडले.

  • होमगार्डची तयारी करणाऱ्या तरुणासह दोघांचा मृत्यू.

संजय राठोड, साम प्रतिनिधी

महाराष्ट्रासाठी या आठवड्याचा पहिला दिवस काळ दिवस ठरला. सोमवारी राज्यातील ६ ठिकाणी झालेल्या अपघाताच्या घटनेत तब्बल २२ जणांचा बळी गेला आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच महाबळेश्वर घाटामध्ये एक स्कॉर्पिओ गाडी खोल दरीमध्ये कोसळल्याची घटना घडली यात ८ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. आता हाती सहावी अपघातचं वृत्त आले आहे. हा अपघात यवतमाळमधील पुसदमध्ये घडला असून यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

YAVATMAL ACCIDENT: SPEEDING TIPPER KILLS TWO, HOME GUARD ASPIRANT DIES
Accident: उकाड्यामुळे घराबाहेर झोपले अन् भयंकर घडलं, भरधाव डंपरने चौघांना चिरडले; संपूर्ण कुटुंबाचा करुण अंत

यवतमाळमधील पुसद-माहूर रोडवर विचित्र अपघात झाला आहे. पुसद येथील इंदिरानगर परिसरातील डम्पिंग ग्राउंडजवळ माहुरकडून पुसदच्या दिशेने येणाऱ्या टिप्परने दोन दुचाकीस्वारांना उडवल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला तर या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मृत पावलेल्य दोघांपैकी जण हा होमगार्डची तयारी करत होता. अरविंद राठोड राहणार कोठारी तर गणेश जाधव अशी मृतकांची नावे आहेत. तर अनिता राठोड नावाची महिला गंभीर जखमी झाली आहे. मृतक गणेश जाधव हा तरूण होमगार्डची तयारी करित होता.

गेल्या २४ तासात राज्यभरात ६ अपघात

पहिला सर्वात भयानक अपघात आंबेनळी घाटात घडला. स्कॉर्पिओ कार हजार फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील ८ तरुण या स्कॉर्पिओ जिपने प्रवास करत होते. आंबेनळी घाटातील एका तीव्र आणि धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. आणि कर थेट दरीत कोसळली.

एसटी बसने दुचाकीला चिरडले, ४ जणांचा जागीच मृत्यू

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी एक भीषण अपघाताची घटना घडली. अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील आळेफाटा परिसरात एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कल्याणहून आळेफाट्याकडे जाणाऱ्या एसटी बसने दुचाकीला धडक दिली होती.

YAVATMAL ACCIDENT: SPEEDING TIPPER KILLS TWO, HOME GUARD ASPIRANT DIES
Accident News : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, कार आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू

मुंबई-आग्रा महामार्गावर तिहेरी अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू

धुळे येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. यात ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. रेतीचा डंपर आणि ट्रॅव्हल्स गाड्यांमध्ये जोरदार धडक होऊन तिहेरी अपघात झाल्यानं ६ जणांचा जीव गमावावा लागला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.

मोखाड्यात दुचाकीचा अपघात दोन तरुणांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

मोखाडा तालुक्यातील गोमघर या गावा जवळ दोन मोटरसायकलींचा जोरात अपघात होऊन यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. खोडाळावरून वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गोमघर गावाच्या परिसरात दोन मोटरसायकल एकमेकांना धडकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com