

why Narhari Zirwal may resign minister post Maharashtra : मंत्री नरहरी झिरवळांच्या रुपाने दादांच्या राष्ट्रवादीची आता तिसरी विकेट जाण्याची शक्यता आहे..मात्र त्याचं नेमकं कारण काय आहे... पाहूयात स्पेशल रिपोर्टमध्ये.
मंत्रालयात लाचखोरीच्या प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या नरहरी झिरवळांचा पाय आणखी खोलात गेलाय....कारण मंत्री झिरवळांचा कथीत व्हिडीओ समोर आला आणि राज्यात एकच खळबळ उडाली.. ...
दुसरीकडे एका माजी मंत्र्याला झिरवळांची विकेट घ्यायची असल्यानेच हे प्रकरण समोर आल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय.. तर शिंदेसेनेच्या निलेश राणेंनी मात्र या प्रकरणी सावध भूमिका घेतलीय..
मंत्रालयात झिरवळांच्या खात्यातील क्लर्कला 35 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली होती.. त्यानंतर झिरवळांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला.. आता पुन्हा एकदा झिरवळांचे कथित व्हिडीओ समोर आल्यानं झिरवळ अडचणीत आलेत..
राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर अवघ्या 4 महिन्यांच्या आतच सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं.. पुढे बोगस कागदपत्राचा वापर करत घरं लाटल्याप्रकरणी माणिकराव कोकाटेंचंही मंत्रिपद गेलं.. आता झिरवळांचे कथित व्हिडीओ समोर आल्यानं त्यांच्याही मंत्रिपदावर टांगती तलवार आहे.. त्यामुळे झिरवळांचा व्हिडीओ खरा आहे का? झिरवळांना अडकवण्यासाठी कुणी हनी ट्रॅपचा कट रचलाय का? याचा सखोल तपास करण्याची गरज आहे.. आणि हा व्हिडीओ जर खरा असेल तर सरकारी निवासस्थानात राज्याच्या अब्रूचे धिंडवडे काढल्यानं झिरवळांचा राजीनामा घेतला जाणार का? आणि झिरवळांचं मंत्रिपद गेल्यास मुंडे पुन्हा इन होणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.