मनोज जयस्वाल, साम टीव्ही
वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा परिसरातून एक धक्कादायक हत्याकांड समोर आला आहे. दोन मजुरांमध्ये झालेला शिल्लक वाद झाला आणि तो इतका टोकाला गेला की यात एका मजुराला आपला जीव गमवावा लागला. एवढंच नाही तर हत्या केल्यानंतर मृतदेह शेतात खड्डा खोदून पुरला. मात्र, शेतमालकाला मिळालेल्या माहितीमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीला अखेर अटक केली आहे.
छत्रपती संभाजीनगर-नागपूर महामार्गावरील अनई फाट्याजवळ संतोष तिडके यांच्या शेतात ही घटना घडली. तिडके यांनी शेतीच्या कामासाठी मध्य प्रदेशातील दोन मजुरांना कामावर ठेवलं होतं. यामध्ये युवराज धुरारी बोरखडे, रा. छिंदवाडा, मध्य प्रदेश आणि दिनेश उईके यांचा समावेश होता. २० सप्टेंबर रोजी दोघेही शेतात कामावर असताना त्यांच्यात भाजी बनवण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून दिनेश उईके याने युवराज बोरखडे याची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शेतातच खड्डा खोदून मृतदेह पुरवला.
दरम्यान शेतमालक संतोष तिडके यांनी एका मजुराशी संपर्क साधला असता त्यांना घटनेची माहिती मिळाली. तिडके यांनी तातडीने कारंजा शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. घटनेनंतर आरोपी दिनेश उईके पसार झाला होता. मात्र, कारंजा पोलिसांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे. हत्येमागील नेमकं कारण काय होतं याचा तपास आता कारंजा पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.