कोल्हापुरात मन हेलावणारी घटना, २ चिमुकल्यांचा जीव घेतला, त्यानंतर आईनेही आयुष्य संपवलं

Jaysingpur latest news : कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे आई आणि तिच्या दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मच्छी मार्केट परिसरातील या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Jaysingpur latest news
Jaysingpur latest news
Published On

रणजीत माझगावकर, कोल्हापूर प्रतिनिधी

mother and two children found dead in Jaysingpur Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथून एक अत्यंत सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. एका आईने आपल्या दोन चिमुकल्या मुलांना गळफास लावून स्वतःही आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेत आईसह दोन निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण जयसिंगपूर परिसरावर शोककळा पसरली आहे.

ही धक्कादायक घटना जयसिंगपूर शहरातील मच्छी मार्केट परिसरात घडली. संगीता राजू गाडीवडर (वय २५), मुलगी प्रगती राजू गाडीवडर (वय ४) आणि मुलगा प्रतीक राजू गाडीवडर (वय दीड वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. एकाच घरातील तिघांचे मृतदेह पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. आईने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणांमुळे उचलले, हे अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Jaysingpur latest news
Pune : आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा मृतदेह आढळला, बारामतीत खळबळ

घटना कशी उघडकीस आली?

संगीता यांचे काका दत्ता हे सायंकाळी कामावरून घरी परतले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ हाक मारूनही आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने, त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी प्रगती आणि प्रतीक हे ओढणीच्या साहाय्याने, तर संगीता यांनी साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदनासाठी) जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. या वेळी आरोग्य केंद्राबाहेर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

Jaysingpur latest news
Maharashtra Farmer : २ एकरात ३ पिके अन् १५ लाखांचे उत्पन्न, शेतकऱ्याचा 'हा' फॉर्म्युला पाहून कृषी तज्ञही चक्रावले

दुपारी पती-पत्नीमध्ये झाला होता वाद

जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी आईने दोन मुलांना गळफास दिल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशी दुपारी पती-पत्नीमध्ये वाद झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या दुर्दैवी घटनेचा पुढील अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com