Rohit Pawar PA Daughter Death : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाच्या (PA) अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने बारामती शहरात खळबळ उडाली आहे. बारामतीतील रुई परिसरातील साईनगर भागात या मुलीचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणानंतर बारामतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आईसोबत झालेल्या वादानंतर अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेली होती. त्यानंतर काही वेळातच तिचा मृतदेह साईनगर परिसरात आढळून आल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. हा प्रकार हत्या आहे की आत्महत्या, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून या घटनेचा गांभीर्याने तपास करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून, तो पोस्टमार्टमसाठी बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच आमदार रोहित पवार हेदेखील बारामती शासकीय रुग्णालयात पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, शवविच्छेदन अहवाल आणि अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या १२ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने बारामती शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आई आणि मुलीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या रागातून मुलगी घरातून निघून गेली. ती परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, मंगळवारी सकाळी तिच्या घराजवळच तिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.