Akola Crime: अकोला हादरले! शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार, ४ गोळ्या झाडून चुलत भावाची हत्या

Akola Crime Police: अकोल्यामध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. तरुणाची चुलत भावाने निर्घृण हत्या केली. शेतामध्येच गोळ्या झाडून भावाला संपवलं.
Akola Crime: अकोला हादरले! शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार, ४ गोळ्या झाडून चुलत भावाची हत्या
Akola Crime:Saam Tv
Published On
  • अकोल्यात शेतीच्या वादातून चुलत भावाची हत्या

  • निंबी मालोकार गावात गोळीबाराचा थरार

  • चार गोळ्या झाडून भावाला संपवलं

  • आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू

अक्षय गवळी, अकोला

अकोला जिल्ह्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतीच्या वादातून एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एक नव्हे दोन नाही तर तीन ते चार गोळ्या झाडून तरुणाला जागीच संपवण्यात आलं. अमोल गजानन मालोकार असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. नातेवाईकानेच अमोलची हत्या केली असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली.

अमोल मालोकार याची हत्या दूरच्या चुलत भावाने केली. अकोला शहरापासून 10 किमी अंतरावर असलेल्या 'नींबी मालोकार' गावात ही घटना घडली. आज सायंकाळच्या सुमारास निंबी मालोकार शेतशिवारात अमोलच्या कानामध्ये आणि इतर ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शेतकरी कुटुंबात संपत्तीचा वाद थेट जीवावर बेतल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Akola Crime: अकोला हादरले! शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार, ४ गोळ्या झाडून चुलत भावाची हत्या
Cyber Crime News : Telegram Task Scamचा पर्दाफाश; कोट्यवधींची सायबर फसवणूक, खार पोलिसांची मोठी कारवाई

बाळापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निंबी मालोकार गावातील या घटनेमुळे अकोला हादरले. संपत्तीच्या वादातून चुलत भावाला गोळ्या झाडून ठार मारण्यात आले. अजयने अमोलची हत्या केली. सध्या आरोपी फरार आहे. घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस अधिकारी नींबी मालोकार गावात दाखल झाले आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या शोधार्थ पोलिसांकडून चार पथक गठीत करण्यात आले.

Akola Crime: अकोला हादरले! शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार, ४ गोळ्या झाडून चुलत भावाची हत्या
Kalyan Crime: कल्याण हादरले! डोक्यावर वार करत तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह गोणीत भरून २४ तास पाण्यात ठेवला

लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असं आश्वासन अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांना दिलंय. दरम्यान, या प्रकरणात बाळापुर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान अजय नामक व्यक्तीने अमोलच्या कानात आणि इतर ठिकाणी गोळ्या झाडून त्याला कायमचं संपवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com