चेतन व्यास
वर्धा : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. (Wardha) वर्धेच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने ग्रामपंचायत (Gram Panchayat) कामगारांचे काम बंद आंदोलन करत उपोषणाला सुरवात केली आहे. (Tajya Batmya)
वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कामगारांचा या आंदोलनात सहभाग दिसून आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे (Zilha Parishad) वेतनश्रेणी मंजूर करा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानासाठी लाभलेली वसुलीची अट पूर्तता रद्द करा व ऑगस्ट २०२० ते मार्च २०२२ पर्यंतचा थकीत वेतन तात्काळ अदा करा; या मागण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
२९ फेब्रुवारीपर्यंत कामबंद
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून या आंदोलनाला सुरवात केली आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून २९ फेब्रुवारीपर्यंत काम बंद आंदोलन चालणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले. कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीमधील चालणारे गावगाड्याच्या काम ठप्प झाली आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.