Nandurbar News : धक्कादायक..रुग्णवाहिका बंद पडल्याने गाडीतच प्रसूती; प्रकृती खालावल्याने महिलेचा मृत्यू

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजला जाणाऱ्या पिंपळखुटा गावातील राऊतपाडा पर्यत पोहचणारा रस्ताच खराब आहे. शासनाच्या कागदावरिल याच विकासाच्या परिभाषेमुळे अतिदुर्गम भागात अनेकांना आपले प्राण गमावावे लागले
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा गावातल्या एका महिलेला आरोग्य व्यवस्थेच्या (Nandurbar) बोजबाऱ्यामुळे जीव गमवावा लागला आहे. नादुरुस्त रुग्णावाहीकेमुळे या महिलेची प्रसुतीही रुग्णवाहीतेच (Ambulance) झाली आणि पुढे प्रसुतीमधील काही उणींवामुळे तिला गमवावा लागला आहे. बाळाला आयुष्य देवून जगाच्या निरोप घेणारी कविता ही शासनाच्या अनास्थेची शिकार झाली असून याबाबत आरोग्य यंत्रणेला जाग कधी येणार असा प्रश्न आत पुढे येत आहे. (Live Marathi News)

Nandurbar News
Unseasonal Rain : ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका; अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत

नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजला जाणाऱ्या पिंपळखुटा गावातील राऊतपाडा पर्यत पोहचणारा रस्ताच खराब आहे. शासनाच्या कागदावरिल याच विकासाच्या परिभाषेमुळे अतिदुर्गम भागात अनेकांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. याच शासनकी अनास्थेचा कविता मगन राऊत या बळी ठरल्या आहेत. कविताला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्यानंतर कविता राऊत यांच्या कुटुंबीयांनी जवळच्या पिपंळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र याठिकाणी (Health Department) वैद्यकीय अधिकारी नसल्याने उपलब्ध नर्सने तिची तपासणी करुन मोलगी ग्रामीण रुग्णालयात रेफर केले. यासाठी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेली रुग्णवाहीका देण्यात आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar News
Bribe Trap : कच्च्या परमिटसाठी लाचेची मागणी; आरटीओतील वरिष्ठ लिपीक, एजंट ताब्यात

रुग्णवाहिकेत प्रसूतीनंतर खालावली प्रकृती 

मात्र रुग्णवाहीका रस्त्यात एका चढावावर बंद पडली आणि कविताची रस्त्यामध्येच नादुरुस्त रुग्णवाहीकेत प्रसुती झाली. प्रसुती दरम्यान काही गुंतागुतींमुळे बाळाला जन्म दिलानंतर तिची प्रकृती खालावली. याठिकाणी अर्धातासानंतर यंत्रणेकडून मोलगी ग्रामीण रुग्णालयाची गाडी दाखल झाली. मात्र उपचारासाठी पुढे तिला ग्रमाणी रुग्णालय मोलगी इथे नेल्यावर तिची प्रकृती पाहता तिला जिल्हा सामान्य रुग्णालयता हलविण्याचे सांगण्यात आले. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालय गाठण्याआधीच कविताने आपले प्राण सोडले. कविताच्या घरापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यत खराब रस्ते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी यांची अनुपस्थीती. त्यानंतर नादुरुस्त रुग्णवाहिका हे सारे कविताच्या प्राणासाठीच कारणीभुत ठरले. 

Nandurbar News
Crop Loan : हंगाम संपला तरी ६ हजार शेतकऱ्यांना पिक कर्जाची प्रतीक्षा

आतापर्यंत झाले ३२ माता मृत्यू 

कविता ही प्रसुती दरम्यानच्या मृत्युचे आज जरी प्रातिनिधी उदाहरण असली, तरी गेल्या वर्षात ४७ तर चालु वर्षात आतापर्यत ३२ माता मृत्यु झाले आहे. हे आकडे गंभीर असून यासाठी आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र अपुरे आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि त्यातच तोकडी आरोग्य यंत्रणेच्या सहाय्याने आरोग्याच्या या समस्येवर त्यांच्याकडून फुंकर मारण्याची आशा बैमानीच म्हणावी लागेल. ह्या साऱ्या प्रकाराबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणा सखोल तपास करत असून जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाईची भाषा देखील करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com