Crop Loan : हंगाम संपला तरी ६ हजार शेतकऱ्यांना पिक कर्जाची प्रतीक्षा

Washim News : वाशिम जिल्ह्याला १५५ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. १३ हजार ९९० शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणे अपेक्षित होते.
Crop Loan
Crop LoanSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 

वाशिम : शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी बँकांमार्फत पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात असते. हे कर्ज घेऊन (Farmer) शेतकरी शेतात पिकांची लागवड करून उत्पन्न घेत असतो. मात्र हंगाम संपत आला असून (Washim) अद्याप ६ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नसल्याचे चित्र वाशीम जिल्ह्यात पाहण्यास मिळाले. (Maharashtra News)

Crop Loan
Unseasonal Rain : ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका; अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत

वाशिम जिल्ह्यातील १३ हजार ९९० शेतकऱ्यांना पीक कर्ज (Crop Loan) वाटपाचे उद्दिष्ट होते. रब्बी हंगाम २०२३- २४ या वर्षात वाशिम जिल्ह्याला १५५ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. १३ हजार ९९० शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणे अपेक्षित होते. मात्र, कोणत्या बँकेने किती कर्ज वाटप करावे, याबाबत उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. त्यानुसार कर्ज वाटप करणे अपेक्षित असतानाही अनेक (Bank) बँकांनी कर्ज वाटपास दिरंगाई केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Crop Loan
Bribe Trap : कच्च्या परमिटसाठी लाचेची मागणी; आरटीओतील वरिष्ठ लिपीक, एजंट ताब्यात

६ हजार शेतकरी प्रतीक्षेत 

यात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात आतापर्यंत सात हजारावर शेतकऱ्यांना विविध बँकांनी ८६ कोटी ७५ लाख ७१ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले. त्यामुळे सहा हजार शेतकरी पिक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. आता हंगाम संपण्यावर आला असताना या शेतकऱ्यांना कर्ज कधी मिळणार हा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com