Bribe Trap : कच्च्या परमिटसाठी लाचेची मागणी; आरटीओतील वरिष्ठ लिपीक, एजंट ताब्यात

Parbhani News : दुर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करण्यासाठी चारचाकी वाहन खरेदी करायचे असल्याने कच्चा परमिटसाठी आरटीओतील वरिष्ठ लिपिक, खाजगी इसमाने लाचेची मागणी केली.
Bribe Trap
Bribe TrapSaam tv
Published On

परभणी : टूर्स अण्ड ट्रॅव्हल्स व्यवसाय करण्यासाठी कच्चा परमिट काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात (Parbhani) खाजगी इसमाने वरिष्ठ लिपीकासाठी ३ हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती २ हजार ७०० रुपये मागणी करत ही रक्कम स्वीकारताना एजंट व वरिष्ठ लिपिकास एसीबीने (ACB) ताब्यात घेतले आहे. (Tajya Batmya)

Bribe Trap
Chandur Railway Kharedi Vikri Sangh : चांदूर रेल्वे खरेदी विक्री सोसायटी अध्यक्षपदी गाेविंदारव देशमुख, उपाध्यक्षपदी पकंज शिंदे

दुर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करण्यासाठी चारचाकी वाहन खरेदी करायचे असल्याने कच्चा परमिटसाठी आरटीओतील वरिष्ठ लिपिक, खाजगी इसमाने लाचेची (Bribe) मागणी केली. तडजोडी अंती २ हजार ७०० रुपये देण्याचे ठरले. वरिष्ठ लिपीकाने खाजगी इसमाकडे सदरची रक्कम देण्याचे सांगितले. याबाबत (Jalna) जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली. त्यानुसार पडताळणी करून सापळा रचण्यात आला. यानंतर २६ फेब्रुवारीला २ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bribe Trap
Unseasonal Rain : ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका; अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत

जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. पथकाने आरटीओतील वरिष्ठ लिपीक गणेश दामोधर टाक, खाजगी इसम मोहम्मद मसुद मोहम्मद रशिद यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस उपअधिक्षक किरण बिडवे, पोलीस अंमलदार शिवाजी जमघडे, गजानन घायवट, गणेश चेके, गणेश बुजाडे यांच्या पथकाने केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com