Wardha Police : वर्धा जिल्ह्यातील 'त्या' दोन्ही पोलिसांचे निलंबन, 'ते' प्रकरण भाेवलं

Wardha Accident News : या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला हाेता. युवकांच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
wardha two police suspended after found guilty in drunk and driving incident
wardha two police suspended after found guilty in drunk and driving incidentSaamTv

चेतन व्यास

Wardha News :

महिला पोलिस अंमलदार आणि अंमलदार या दोघांनीही मद्यधुंद अवस्थेत चार चाकी वाहन चालवून दुचाकीचालकांना जबर धडक देत जखमी केले होते. याचे वृत्त साम टीव्हीने प्रसारित केले हाेते. तक्रारदाराची दखल घेत वर्धा पोलिस विभागाने (wardha police department) संबंधितांचे चौकशीचे आदेश दिले हाेते. चौकशीअंती दोघेही दोषी आढळून आल्याने दाेन्ही पाेलिसांना निलंबित करण्यात आले आहे. (Maharashtra News)

महिला पोलिस अंमलदार पूजा गिरडकर आणि अंमलदार मनोज सूर्यवंशी हे दोघेही कारमधून मद्यधुंद अवस्थेत प्रवास करीत होते. चालक पूजा गिरडकर यांनी भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून आर्वी नाका ते कारला चौकादरम्यान दुचाकीला जबर धडक देत दोन युवकांना जखमी केले होते.

wardha two police suspended after found guilty in drunk and driving incident
Chandur Railway Kharedi Vikri Sangh : चांदूर रेल्वे खरेदी विक्री सोसायटी अध्यक्षपदी गाेविंदारव देशमुख, उपाध्यक्षपदी पकंज शिंदे

उपस्थितांनी या घटनेचा मोबाइलमध्ये व्हिडीओ चित्रित करून सर्वत्र व्हायरल केला. या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध जखमी युवकांच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर घटनेचा गतीने तपास करण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांची चाैकशी करण्यात आली. या चाैकशीअंती त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याबाबतचा आदेश नुकताच पारित झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

wardha two police suspended after found guilty in drunk and driving incident
Shahada : जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी निवडणुकीत 'लोकशाही'चा दणदणीत विजय, शेतकरी पॅनलच्या हाती भाेपळा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com