

चेतन व्यास
वर्धा : वर्धा महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला जिल्हा आहे. वर्धा लोकसभा नेहमीच काँग्रेसचा (Congress) गढ राहिला आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वर्धा लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्याच ताब्यात ठेवावी अशी मागणी (Wardha) आज काँग्रेस कार्यकर्त्यानी काँग्रेसचे वर्धा लोकसभा निरीक्षक सुनील केदार यांच्या समोर ठेवली. (Maharashtra News)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून राज्यात लोकसभा निहाय निरीक्षकांची नियुक्ती करत निवडणुकीच्या तयारीला सुरवात केली आहे. वर्धा लोकसभेच्या निरीक्षक पदी माजी मंत्री सुनील केदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सुनील केदार यांनी वर्धा लोकसभा मतदार संघाच्या मतदार संघ निहाय आढावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. यावेळी माजी मंत्री रणजित कांबळे यांनी या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार पुन्हा निवडून आणू आणि त्याकरिता कार्यकर्त्यांनीही कामाला लागावे असे आवाहन केले.
उमेदवार लवकर ठरवा
वर्धा लोकसभा संघ हा काँग्रेसचा गड राहिला आहे. मात्र या गडाला खिंडार पाडत भाजपने हार्दिक लोकसभा मतदार संघ आपल्या ताब्यात घेतला आहे. परंतु हि जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी केली आहे. सोबतच निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी जाहीर न करता लवकर उमेदवार ठरवावा. जेणेकरून लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी मेहनत करता येईल; अशी मागणी सुद्धा करण्यात आली. यावेळी माजी मंत्री तथा आमदार रणजित कांबळे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, शिरीष गोडे, प्रभारी जिया पटेल उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.