Sambhajinagar Fraud Case: एक लाखात कोटींचा पाऊस; फसवणूक करणारा भोंदू ताब्यात, तरुणाला ३ लाखांचा गंडा

Sambhajinagar News एक लाखात कोटींचा पाऊस; फसवणूक करणारा भोंदू ताब्यात, तरुणाला ३ लाखांचा गंडा
Sambhajinagar Fraud Case
Sambhajinagar Fraud CaseSaam tv
Published On

नवनीत तापडिया 

छत्रपती संभाजीनगर : एका लाखात एक कोटीचा पाऊस पडणार असल्याची थाप मारून एका भोंदूबाबांनी (Sambhajinagar) पूजेसाठी ठेवलेले ३ लाख रुपये घेऊन ९ मेस फरार झाला होता. या भामट्याला जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून पोलिसांनी अटक केली. दिलावर पिंजारी असे या भामट्याचे नाव आहे. (Tajya Batmya)

Sambhajinagar Fraud Case
Jalgaon Bus Accident: बसचा मोठा अपघात टळला..धावत्या बसचा रॉड तुटला; चालकामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 

कन्नड तालुक्यातील शफियाबाद येथील बाबासाहेब मोकासे या तरुणाला जळगाव जिल्ह्यातील एका भोंदूबाबाने जाळ्यात अडकवले होते. एका लाखात एक कोटी रुपयांचा पाऊस पडणार असल्याचे सांगून त्याला पूजा (Fraud) करण्यास सांगितले. त्यानुसार त्याने स्वतःच्या घरात पूजा मांडून पूजेवर ३ लाख ११ हजार रुपये ठेवले. मात्र या भामट्याने चार तास पूजा करून मंत्र पठण केले.  

Sambhajinagar Fraud Case
Parbhani News: प्रहार जनशक्ती संघटनेकडून पिंडदान आंदोलन; पुलाचे काम पूर्णत्वास नेण्याची मागणी

यानंतर नाशिक येथून पूजेसाठी वस्तू आणायच्या सांगून पूजेवर ठेवलेले ३ लाख ११ हजार रुपये घेऊन फरार झाला. या भामट्याने घरी पैशाचा पाऊस पाठवतो म्हणून सांगितले होते. मात्र बाबासाहेब घरी आल्यानंतर पैशांचा पाऊस काही पडला नाही. यात आपण फसवले गेल्याचे लक्षात येताच बाबासाहेब मोकासे याने पिशोर पोलिसात तक्रार दिली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com