Jalgaon Bus Accident: बसचा मोठा अपघात टळला..धावत्या बसचा रॉड तुटला; चालकामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 

Jalgaon News :
Jalgaon Bus Accident
Jalgaon Bus AccidentSaam tv
Published On

जळगाव : जळगाव बसस्थानकातून ५० प्रवाशी घेऊन मार्गस्थ झालेली जळगाव- बांबरुड या धावत्या बसचा रॉड तुटल्याने अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. यावेळी बसमधील प्रवाशांमध्ये गोंधळ व आरडाओरड (Jalgaon) सुरु झाली. मात्र या प्रवाश्यांसाठी बस चालक देवदूत ठरल्याचा प्रत्यय आला आहे.  (Live Marathi News)

Jalgaon Bus Accident
Vijay Wadettiwar Statement : प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत CM एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला जाणार, विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

तालुक्यातील शिरसोली गावाजवळ रविवारी सायंकाळी ही घटना घडली. जळगाव ते पाचोरा तालुक्यातील बांबरुड गावाला जाण्यासाठी सायंकाळच्या सुमारास जळगाव बसस्थानकातून जळगाव डेपोची बस निघाली होती. या बसने जळगाव सोडल्यानंतर प्रवासात शिरसोली गावाजवळ बसच्या पुढील चाकाजवळचा रॉड तुटल्याने बस (Bus Accident) खाली झुकली. यात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले असतानाही चालकाने सतर्कता दाखवत बस रस्त्याच्या एका बाजूला सुरक्षितपणे उभी केल्याने मोठा अपघात टळला आहे. हेमंत पाटील असे बसचालकाचे नाव आहे. 

Jalgaon Bus Accident
Parbhani News: प्रहार जनशक्ती संघटनेकडून पिंडदान आंदोलन; पुलाचे काम पूर्णत्वास नेण्याची मागणी

प्रवाशांची आरडाओरड 

रॉड रुतल्याने चालकाचे स्टेरींगवरील नियंत्रण सुटले. यावेळी प्रवाशांनी आरडाओरड सुरु झाली होती. मात्र, यानंतरही प्रसंगावधान दाखवत चालक हेमंत पाटील यांनी बस रस्त्याचा कडेला लावली. त्यामुळे अपघात होवून मोठा अनर्थ टळला आहे. चालक हेमंत पाटील यांनी सतर्कता दाखवित बस थांबविली अन्यथा आमच्यासोबत काय घडले असते सांगता येत नाही. बस चालक हे आमच्यासाठी देवदुत ठरल्याची प्रतिक्रिया बसमधून सुखरूप खाली उतरल्यानंतर प्रवाशांनी व्यक्त केली. यावेळी चालक हेमंत पाटील यांचे दाखविलेल्या सतर्कबद्दल प्रवाशांनी टाळ्या वाजवून तसेच त्यांना श्रीफळ देवून त्यांचे स्वागत तसेच सत्कार केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com