Wardha Accident News: दुर्देवी घटना! नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन पलटी; चालकाचा जागीच मृत्यू

Wardha Arvi Road Accident: वर्धा आर्वी मार्गावर अनियंत्रीत चारचाकी वाहन पलटी होऊन अपघाताची दुर्घटना घडली आहे.
Wardha Accident News
Wardha Accident NewsSaam tv

चेतन व्यास, प्रतिनिधी...

Vardha Accident News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातांची मालिकाच सुरू आहे. वर्ध्यामध्ये एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. वर्धा आर्वी मार्गावर अनियंत्रीत चारचाकी वाहन पलटी होऊन अपघाताची दुर्घटना घडली आहे. यामध्ये चालकाचा दुर्देवी मृत्यू झाला असून क्लिनर जखमी झाला आहे.

Wardha Accident News
Wardha Accident News: साडीचा पदर बाइकच्या चेनमध्ये अडकून मायलेकी रस्त्यावर पडल्या, पाठीमागून टँकर आल्यानं अनर्थ घडला

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळखुटा येथून बॉयलर कोंबड्या भरलेले वाहन वर्ध्याकडे जात होते. वर्धा आर्वी मार्गावर खरांगणा (मोरांगणा) शिवारात आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. ज्यामुळे अनियंत्रित झालेले वाहन पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये गाडीच्या चालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (Accident News)

या अपघातात गाडीचा क्लिनरही गंभीर जखमी झाला. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून याप्रकरणी खरांगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Wardha Accident News
Beed News : पालकमंत्री अतुल सावेंनी टक्केवारी गोळा करण्यासाठी एजंट नेमलेत; NCP आमदार बाळासाहेब आजबेंचा गंभीर आरोप

मायलेकीचा दुर्देवी मृत्यू...

दरम्यान, एक दिवसापूर्वीच वर्धा जिल्ह्यातून एक भयानक अपघाताची बातमी समोर आली होती. ज्यामध्ये नातेवाईकाच्या लग्नाला दुचाकीवरून निघालेल्या मायलेकीचा दुर्देवी मृत्यू झाला. महिलेच्या साडीचा पदर दुचाकीच्या चेनमध्ये अडकला, काही कळण्याच्या महिला आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीसह रस्त्यावर कोसळली. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या टँकरने दोघींनाही चिरडले. या घटनेत माय-लेकींचा दुर्देवी अंत झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com