Beed News : पालकमंत्री अतुल सावेंनी टक्केवारी गोळा करण्यासाठी एजंट नेमलेत; NCP आमदार बाळासाहेब आजबेंचा गंभीर आरोप

Beed News : अतुल सावे हे एजंट नेमून विकासकामाच्या नावाखाली टक्केवारी गोळा करत आहेत.
Beed News
Beed News Saam TV
Published On

Beed News : बीड जिल्ह्यात कामांसाठी टक्केवारी घेतली जातेय अशी जोरदार चर्चा आजवर सुरू होती. मात्र आता थेट राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. टक्केवारी गोळा करण्यासाठी पालकमंत्र्यांनी एटंज नेमल्याचा आरोप आजबे यांनी केला आहे.

अतुल सावे हे एजंट नेमून विकासकामाच्या नावाखाली टक्केवारी गोळा करत आहेत. त्यांनी जिल्ह्यातून कामांसाठी 10 टक्क्यांनी वसुली केली आहे. आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी 10 टक्के देऊन कामे आणली आहेत. (Beed News)

Beed News
Rahul Gandhi On Parliament Building Inauguration: नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, मोदींवर निशाणा साधत म्हणाले...

टक्केवारी दिल्याशिवाय एकही काम त्यांनी दिलं नाही, असा खळबळजनक आरोप आमदार बाळासाहेब आजबे यांनी सावे यांच्यावर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

Beed News
Amravati Policeman Set Record: कौतुकास्पद! 22 मिनिटांत पाण्यावर केली 50 योगासने, अमरावतीच्या पोलिसाची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

दरम्यान अतिवृष्टीमध्ये पालकमंत्री अतुल सावे यांनी बीड जिल्ह्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे हे टक्केवारी पालकमंत्री बदलावेत, अशी देखील मागणी यावेळी आमदार आजबे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com