Amravati Policeman Set Record: कौतुकास्पद! 22 मिनिटांत पाण्यावर केली 50 योगासने, अमरावतीच्या पोलिसाची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

India Book Of Records: प्रवीण आखरे यांच्या कामगिरीचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.
Amravati Policeman Set Record
Amravati Policeman Set RecordSaam Tv

Amravati News: अमरावती पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिसाने पाण्यावर योगासने करुन जबरदस्त कामगिरी केली आहे. या पोलिसाने एका तासांत पाण्यावर 50 योगासने केली आहेत. त्यांच्या या योगासनाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. या पोलिसाचे सर्वस्तरावरुन कौतुक होत आहे.

Amravati Policeman Set Record
Dhananjay Munde: लोकसभा निवडणूकीबाबत धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितले; दिल्ली माझ्यासाठी खूप लांब

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहर पोलीस दलात कार्यरत प्रवीण दादाराव आखरे यांनी हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. तासाभरात पाण्यात 25 योगासन करण्याचे टार्गेट असताना त्यांनी अवघ्या 22 मिनिट 52 सेकंदात पाण्यावर 50 योगासन करून नवा विक्रम नोंदवला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.

तासाभरात सर्वाधिक 50 योगासनेची नोंद आज या निमित्ताने अमरावती येथे झाली आहे. अमरावती शहरातील तक्षशिला महाविद्यालय येथील जलतरण केंद्रात इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी प्रवीण आकडे हे जलतरण तलावात उतरले आणि त्यांनी अवघ्या 12 मिनिट 47 सेकंदात इंडिया बुक ऑफ रेकॉर्डिंग दिले लक्ष पूर्ण केले. यानंतर पुढे 22 मिनिट 52 सेकंदात त्यांनी 50 योगासने करून विक्रम नोंदवला.

Amravati Policeman Set Record
Kolhapur Baby Girl Welcoming Video: पहिली मुलगी झाल्याचा आनंद, जंगी स्वागत करत हत्तीवरुन काढली मिरवणूक; पाहा व्हिडिओ

आता यापुढे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी एका तासात पाण्यावर 50 योगासन करण्याचे टार्गेट ठेवण्यात येणार आहे. अमरावती शहर पोलीस दलात कार्यरत प्रवीण आखरे यांनी योगासन करण्याचा नवा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविला असताना अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस उपायुक्त विक्रम साळी आणि सागर पाटील यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. सध्या प्रवीण आखरे यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com