Kolhapur Baby Girl Welcoming Video: पहिली मुलगी झाल्याचा आनंद, जंगी स्वागत करत हत्तीवरुन काढली मिरवणूक; पाहा व्हिडिओ

Kolhapur News: मुलगी (Girl) नको असे म्हणणाऱ्या समाजासमोर कोल्हापूरातील (Kolhapur) गिरीश पाटील यांच्या कुटुंबाने नवा आदर्श घालून दिला आहे.
Kolhapur Video
Kolhapur Video Saam Tv

Kolhapur News: मुलगी (Girl) नको असे म्हणणाऱ्या समाजासमोर कोल्हापूरातील (Kolhapur) गिरीश पाटील यांच्या कुटुंबाने नवा आदर्श घालून दिला आहे. मुलगी झाल्याच्या आनंदामध्ये गिरीश पाटील यांनी आपल्या मुलीचे जंगी स्वागत केले. त्यांनी मुलीची चक्क हत्तीवरुन वाजत-गाजत मिरवणूक काढली. 'मुलगी नको वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा' अशी मानसिकता असणाऱ्या या समाजासाठी पाटील यांचा हा निर्णय खूपच प्रेरणादायी ठरत आहे.

गिरीश पाटील यांनी मुलगी झाल्याचा एकच जल्लोष केला. त्यांनी इराच्या जन्माचे जंगी स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात हत्तीवरुन मिरवणूक काढत त्यांनी आपल्या मुलीला घरी आणले. संपूर्ण पाटील कुटुंबीय या आनंदात सहभागी झाले होते. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Kolhapur Video
16 Helipad On Samruddhi Highway: मोठा निर्णय! समृद्धी महामार्गावर 16 हेलिपॅड उभारणार, अपघातानंतर जखमींना मिळणार तात्काळ उपचार

कागल तालुक्यातील पाचगावमध्ये गिरीश पाटील आणि मनिषा पाटील हे दाम्पत्य राहतात. गिरीष पाटील हे पुण्यात आयटी क्षेत्रामध्ये काम करतात. या दाम्पत्यांना पाच महिन्यांपूर्वी मुलगी झाली. पहिली मुलगी झाल्यामुळे गिरीश पाटील यांच्यासह कुटुंबीयांना खूपच आनंद झाला. बाळंतपणासाठी त्यांच्या पत्नी मनिषा पाटील या माहेरी गेल्या होत्या. बाळ पाच महिन्यांचे झाल्यानंतर त्या सासरी आल्या. त्यावेळी पाटील कुटुंबीयांनी आपल्या मुलीचे जंगी स्वागत केले.

Kolhapur Video
New Parliament Building: देशाच्या नव्या संसद भवनात राजदंड स्थापित, PM मोदींचा राजदंडाला दंडवत

मुलीच्या स्वागतासाठी त्यांनी ढोल ताशा, सजवलेला रथ, सुशोभित हत्ती यांची व्यवस्था केली होती. गावामध्ये मुलीचे आगमन झाल्यानंतर त्यांनी पाचगावातील शांतीनगरमधील ओम पार्क ते ढेरे मल्टीपर्पज हॉलपर्यंत मिरवणूक काढली. त्यांनी आपल्या लाडक्या मुलीचे नाव इरा ठेवले आहे. या मिरवणूकीत गिरीश पाटील यांचे नातेवाईक, शेजारी सहभागी झाले होते. या मिरवणुकीमध्ये लहान मुलांना वेगवेगळ्या वेशभूषा करुन नटवून सहभागी करण्यात आले होते. पाटील कुटुंबीयांनी आपल्या मुलीच्या स्वागसाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वस्तरावरुन कौतुक होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com