Wardha Crime News: महिला पोलीस शिपाईला घरी बोलावलं, अन् खोलीत नेत केला विनयभंग; आठ जणांवर गुन्हा दाखल

Wardha News: प्रकृती बिघडल्याचा बहाणा करीत महिला पोलिस शिपायाला घरी बोलावून तिला खोलीत नेत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या महिला पोलिसाला चौघींनी लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने जबर मारहाण करीत जखमी केले.
Wardha police station
Wardha police stationSaam Tv
Published On

>> चेतन व्यास, वर्धा

Wardha Crime News:

प्रकृती बिघडल्याचा बहाणा करीत महिला पोलिस शिपायाला घरी बोलावून तिला खोलीत नेत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या महिला पोलिसाला चौघींनी लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने जबर मारहाण करीत जखमी केले. या प्रकरणात महिला पोलीस शिपायाच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी महिलेची शुभांगी देशमुख, रा. गजानन नगर हिच्याशी ओळख होती. पोलीस शिफाई शिपाई कर्तव्यावर असताना शुभांगीने तिला फोन करून प्रकृती बिघडली असल्याने घरी येऊन रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. पोलीस शिपाई शुभांगीच्या घरी गेली असता शुभांगीने तिला घरातील खोलीत नेत दार बंद करून तिचा विनयभंग करीत हातातील सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट काढले.

Wardha police station
Qatar Dahra Global Case: कतारमधील 8 माजी नौसैनिकांच्या शिक्षेविरोधात भारत करणार याचिका, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

दार उघडले असता तेथे आधीच तीन महिला उपस्थित होत्या. त्यांनी व शुभांगीने मिळून महिला पोलीस शिपायाला मारहाण केली. तसेच पट्ट्यानेही मारहाण केली. एका महिलेने पोलिस शिपायाच्या मानलेल्या भावास फोन करून बोलावले. भाऊ आला असता त्यालाही मारहाण करून त्याच्या प्रेयसीला फोन लावण्यास सांगत, मी तुझ्या प्राॅपर्टीवर प्रेम केले, तुझ्यावर नाही, असे बोलण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर त्याच्या प्रेयसीला बोलावून तिला देखील मारण्याची धमकी देत पोलिस शिपाई व तिचा मानलेला भाऊ यांना मारण्यास लावले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घडलेला सर्व प्रकार महिला शिपायाने रामनगर पोलीस ठाण्यात जात कथन केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ शुभांगी देशमुख, रा. गजानन नगर, पल्लवी राऊत, रा. पवनार, प्रीती महेश राऊत, रा. पवनार, शारदा राऊत, रा. पवनार, वैशाली टिपले, रा. गजानन नगर, आविष्कार देशमुख, रा. गजानन नगर, शैलेश राऊत, रा. पवनार, महेश ऊर्फ बबलू राऊत, रा. पवनार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. (Latest Marathi News)

Wardha police station
'मुलींनी त्यांच्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवावं', हायकोर्टाच्या टिप्पणीविरोधात पश्चिम बंगाल सरकारची SC मध्ये याचिका

महिला पोलिस शिपायाला तसेच तिच्या मानलेल्या भावाला मारहाण करीत असताना उपस्थित काही महिला मारहाणीचा व्हिडीओ मोबाइलमध्ये काढत होत्या. मारहाण का करत आहे, हे वारंवार विचारत असतानाही तिला कुणी काहीही सांगण्यास तयार नव्हते. इतकेच नव्हे तर मानलेल्या भावाने जेव्हा त्याच्या प्रेयसीला फोन करून तुझ्या प्राॅपर्टीसाठी तुझ्यावर प्रेम केलं, असे म्हणायला लावले असता ते देखील व्हिडीओत कैद केले. आविष्कार देशमुख याने महिला पोलिस आणि तिच्या भावाच्या मोबाइलमधील डेटादेखील डिलीट केला.

महिला पोलिस शिपाई व तिच्या मानलेल्या भावाच्या नावाचे बेकायदेशीर मुद्रांक आणले. त्या मुद्रांकावर आधीच मजकूर लिहिलेला होता. दमदाटी करून दोघांनाही त्या मुद्रांकावर जबरदस्तीने स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आले. तसेच याची वाच्यता कुठेही केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोघांनाही शैलेश राऊत याच्या कारमध्ये बसवून वर्धा न्यायालयात नेले आणि नोटरी करून घेत त्यानंतर दोघांनाही साेडून दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com